पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर..
श्रीमंत सरदार महादजी शिंदेचा वारसा लाभलेल्या
व वारी सोहळ्यात शिंदे सरकारला मान असणाऱ्या वैष्णवांच्या सोहळ्यातील
Related News
पंढरपूर : आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील वारकरी आणि विठ्ठल भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच पा...
Continue reading
आषाढी एकादशी 2026: संत निवृत्तिनाथ पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; भक्तीचा महासागर, मात्र व्हीआयपी गर्दीने व्यवस्थेची परीक्षा
'वारी चुकायची नाही' हा...
Continue reading
आषाढी वारी 2026: पुण्यात वाहतुकीत 4 मोठे बदल; पालखी मार्गावरील महत्त्वाचे रस्ते बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे: आषाढी एकादशी आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्...
Continue reading
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी माऊलींच्या रथाच्या बैलजोडीच्या मानावरून सुरू झालेला वाद अखेर सामंजस्याने मिटला आहे. आळंदी दे...
Continue reading
आकोट येथील श्री क्षेत्र श्रद्धासागरातून श्री संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूर वारीसाठी भव्य प्रस्थान झाले. हरिनाम, अभंग, दिंडी, पुष्पवृष्टी, वारक...
Continue reading
Pandharpur Ashadhi Wari Special Trains 2026: आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात मोठा आणि भावनिक सोहळा. लाखो वारकरी दरवर्षी "ज्ञान...
Continue reading
पंढरपूर : आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा सर्वात मोठा सोहळा. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे ...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे. काही माशांच्या अंगावर किडे आढळल्याने प्रदूषणाचा संशय व्यक्त होत असून संत तुक...
Continue reading
आळंदीत वारीपूर्वीच खळबळ; मानाच्या बैलजोडीवरून मंदिराबाहेर उपोषण, वातावरण तणावपूर्ण
बैलजोडीवरून मंदिराबाहेर उपोषण : पुणे जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर म...
Continue reading
जगातील पहिली ग्लोबल दिंडी ठरणार ऐतिहासिक
पंढरपूर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आषाढी वारी आता जागतिक पातळीवर पोहोचली आहे. दरवर्षी लाखो व...
Continue reading
वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज
व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखींचे श्रीमंत सरदार महादजी शिंदे
यांच्या पावनभुमीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
वानवडीत भैरोबानाला चौक या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे
सकाळी ७.३० वा आगमन झाले.
माऊलींच्या पालखी मध्ये श्रीमंत सरदार महादजी शिंदेच्या पादुका ठेवून
परंपरेने चालत आलेली मानाची आरती घेण्यात आली.
आरती सुरु होण्याअगोदर चौपदारांकडून स्तंभ फिरवण्यात येतो
आणि एका क्षणात सर्व वैष्णवांचा जनसमुदाय आरतीसाठी सज्ज झाला.
आरतीसाठी वानवडी भजनी मंडळ, ह.भ.प.श्री. बाळासाहेब गव्हाणे
व श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांची समाधी असलेल्या
सिंधिया देवस्थान ट्रस्टचे शिंदे छत्री येथील व्यवस्थापक यशवंतराव भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरती होऊन माऊलींची पालखी हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे वानवडी,
भैरोबानाला येथे सकाळी ९.१५ वा. आगमन झाले.
वानवडी गाव भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे तुकाराम महाराजांच्या पालखी पुढे
आरती घेण्यात आली व वारी सेवा म्हणून वानवडीकरांची दिंडी, भजन व ग्यानवा तुकाराम मुखी ठेवून
हडपसरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
या पालीखीसोहळ्यात वानवडी पोलीस तसेच पोलीस मित्रांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आळंदी ते पंढरपूर पर्यंत असणाऱ्या वारी सोहळ्यात श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/indian-squad-changed-for-series-against-zimbabwe/