अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन-ट्रम्पमध्ये खडाजंगी!

अमेरिकी

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष,

डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यात

गुरुवारी वादचर्चेची पहिली फेरी रंगली.

Related News

बायडेन यांनी अनेक मुद्यांवर ट्रम्प यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक शैलीत बायडेन यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला.

बायडेन हे बऱ्याचदा अडखळत बोलत असल्याचे चित्र दिसल्याने

त्यांच्या उमेदवारीबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्ये चिंतेचा सूर आहे.

बायडेन काय म्हणाले- ट्रम्प यांनी देशात गोंधळाची स्थिती निर्माण केली.

अनेक आघाड्यांवर ट्रम्प अपयशी ठरले.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांनीच समर्थकांना

संसदेवर हल्ला करण्यास चिथावणी दिली

गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आपण पालन करणार आहोत.

हवामानबदलामुळे मानवी अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

मात्र, ट्रम्प यांनी याबाबत काहीच प्रयत्न केले नाहीत.

ट्रम्प काय म्हणाले – माझ्या कार्यकाळात अमेरिकेत सर्वकाही सुरळीत होते.

उलट, माझा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर करोनाने अमेरिकेची वाताहात केली.

बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेऊन गोंधळाची स्थिती निर्माण केली.

युक्रेन विरोधातील रशियाचे युद्ध रोखण्यात बायडेन यांना अपयश आले.

त्यांनी रशियाला युद्धासाठी प्रोत्साहन दिले.

हवामानबदलाबाबत आम्ही नेहमीच कणखर भूमिका घेतली.

त्यासाठी जादा डॉलर्स खर्च केले. इतर देशांनी मात्र हात आखडता घेतला.

Read also: https://ajinkyabharat.com/satsangat-chengarachengri-in-hathras-122-dead/

Related News