वंचित बहुजन आघाडीचे पुन्हा ‘एकला चलो रे’

राज्यात

राज्यात विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढण्याची तयारी

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून

राज्यभरातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Related News

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढण्याची तयारी

वंचित बहुजन आघाडीने सुरू केली असून,

त्यादृष्टीनेच पक्षात चाणक्ष नेत्यांकडून एकला चलो रे’ ची रणनिती आखत आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला

अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

महाविकास आघाडीसोबत चर्चेचे गुऱ्हाळ फिस्कटल्यानंतर

वंचितने स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवली.

राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी

व अपक्षांना वंचितने पाठिंबा देत राज्यातील ४८ पैकी ३८ जागांवर

वंचित आघाडीने आपले उमेदवार स्वबळावर उभे केले;

मात्र २०१९ मध्ये वंचितने घेतलेली मतांची टक्केवारी

यंदा घसरल्याचे निवडणूक निकालानंतर दिसून आले.

वंचितचे गठ्ठा मतदार असलेले दलित, मुस्लीम, बहुजन

व इतर अल्पसंख्याक समाजाची बहुतांश मते यावेळेस

महाविकास आघाडीकडे वळल्याने लोकसभेत वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही.

लोकसभेतील या अपयशानंतरही अॅड. प्रकाश आंबेडकरांनी

कार्यकत्यांना भावनिक साद घालत मी अजूनही आशा सोडलेली नाही,

पुन्हा नव्या दमाने कामाला लागा,

असे आवाहन करीत पदाधिकारी व कार्यकत्यौशी विचारमंथन करून

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणे सुरू केले आहे.

राज्यात आगामी तीन महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार आहेत.

या निवडणुकीसाठी वंचित कामाला लागली.

महाविकास आघाडीसोबत या निवडणुकीतही सूर जुळण्याचे संकेत

दिसत असल्याने वंचित पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ चा नारा देत

संपूर्ण राज्यभर इच्छुक उमेदवारांची अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वंचित फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल – प्रा. पुंडकर

महाविकास आघाडीकडून अद्यापही विधानसभा निवडणुकीत

आघाडीसंदर्भात कुठलीच चर्चा झाली नसून,

त्यांच्याकडून तसा कोणता प्रस्तावही अद्यापपर्यंत आलेला नाही.

त्यामुळे आम्ही संपूर्ण २८८ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निश्चितच

फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल,

असा विश्वास वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष

प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी व्यक्त केला.

जिल्हानिहाय निरिक्षकांची नेमणूक

विधानसभेसाठी वंचितकडून जिल्हानिहाय निरिक्षकांच्या नेमणूक करून

इच्छुक उमेदवारांच्या अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

त्यानंतर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत संबंधित उमेदवारांच्या निवडीवर

अॅड. प्रकाश आंबेडकर शिक्कामोर्तब करतील

वंचितचा फटका कुणाला ?

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढल्याने

राज्यातील किमान चार-पाच जागांवर महाविकास आघाडीला

फटका बसल्याची चर्चा आहे.

आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वंचित स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उत्तरल्यास

याचा फटका कोणाला बसेल ?

अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/afghanistans-pole-vaults-africa-into-the-final-for-the-first-time/

Related News