मुंबई: मित्राकडे दिलेल्या लग्नाच्या व्हिडीओ कॅसेटची चौकशी केल्याच्या कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरातील दहिसर येथे घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडत जबर मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणातील फिर्यादी दीपक रमेश गौड हे घराजवळ शतपावली करत असताना सुमित स्नॅक्स दुकानाजवळ बसलेल्या रोशन मानकर आणि त्याच्या तीन साथीदारांकडे त्यांनी मित्राकडे दिलेल्या लग्नाच्या व्हिडीओ कॅसेटबाबत विचारणा केली. यावरून वादाला तोंड फुटले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चौघांनी मिळून दीपक यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.
दोन्ही बाजूंतील वाद चिघळल्यानंतर आरोपींनी दीपक यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. त्यानंतर फुटलेल्या काचेच्या तुकड्यांनी त्यांच्या चेहऱ्यापासून गळ्यापर्यंत वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात दीपक यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Related News
Manoj Jarange Patilची रुग्णालयातून मोठी घोषणा; ‘आता पाटोद्यापासून पुढे मुंबईत आंदोलन’
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे थेट बांधावर
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; चंपत रायंसह तिघांना क्लिनचिट
‘पद्मभूषण कशाला? ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या’; संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला
पेट्रोल पंपावर UPI पेमेंटचा ₹5 चार्ज हटणार? पेट्रोलियम मंत्रालयाने दिलं मोठं स्पष्टीकरण
26 ते 30 सप्टेंबर बँकिंग कामकाजावर परिणाम; तुमची सॅलरी कधी खात्यात येणार?
इराणचा 7 दिवसांचा प्रस्ताव, ट्रम्प यांची मोठी घोषणा; अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा चर्चेत
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप
सणासुदीत मोठी खुशखबर! खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात
Petrol Diesel Price: कच्चे तेल 100 डॉलरपार; पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सरकारचा मोठा निर्णय
ज्ञानेश कुमारांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? संजय राऊतांचा संतप्त सवाल; महाभियोगाची घोषणा
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत मयुरेश अजय सुर्वे (21), रोशन अमित मानकर (24), यश नरेंद्र पालांडे (22) आणि जय गुलाब लोखंडे (22) या चौघा तरुणांना अटक केली. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिसर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेवर पोलिसांकडून अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
