नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार हिने सात पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी अंधश्रद्धा हे सुध्दा एक कारण होते.पंचवटी पोलीसांनी त्यादृष्टीने तपास करुन हिरवाडी येथुन एका मांत्रिकाला अटक केली असल्याची माहिती अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे.मयत नेहा पवार हिच्या आत्महत्येमागे कौमार्य चाचणी व जादुटोण्याचे कारण असुन त्याचा पोलीसांनी तपास करावा,असे महाराष्ट्र अंनिस व विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीसांच्या लक्षात आणुन दिले.त्याप्रमाणे पोलीसांनी आरोपी संतोष पवार याच्या घराची झडती घेतांना जादुटोणाचे साहित्य मिळाले.नागाचा आकार असलेल्या खिळ्याला काळा बिबा आरपार केलेला आढळला. त्यासोबत गंडेदोरे व ताविज पण मिळाला.
हे साहित्य कुठून आणले,अशी पोलीसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी भोंदुबाबाचे नाव सांगितले. मयत नेहा पवार ही माहेरवरुन राखेसारखी भस्माची पुडी आणत होती. त्यामुळे घरात अडचणी येतात. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी व नेहाला भिती घालण्यासाठी जादुटोणा केल्याचे आरोपी संतोष पवार व जिजाबाई पवार यांनी सांगितले.त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी नाशिकच्या हिरावाडी येथुन सुनिल बबन मुंजे (वय -४२ वर्ष )या मांत्रिकाला सोमवारी रात्री अटक केली.त्याने त्याच्या राहत्या घरी मंदिर व दरबार करुन लोकांच्या समस्यांवर दैवी व अघोरी इलाज करण्याचे काम करत तो होता.त्याने गुन्ह्यांची कबूली दिली आहे.
पोलीसांनी त्याला सहआरोपी बनविले असुन जादुटोणा विरोधी कायद्याचे कलम लावले आहेत.न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहे.”सदर भोंदुबाबाने आणखी कुणाला फसविले त्याची चौकशी पोलीसांनी करावी.लोकांनी अशा अंधश्रद्धायुक्त प्रकारांपासुन दुर रहावे.कुणाची फसवणुक झाली असल्यास अंनिस किंवा नाशिक पोलीसांशी संपर्क साधावा.
Related News
नाशिक: महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा धक्कादायक वळणावर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका...
Continue reading
नाशिकमध्ये भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकारांनी पुन्हा एकदा समाज हादरून गेला आहे. स्वतःला दैवी शक्तींचा अवतार म्हणवणाऱ्या अशोक खरात याच्याविरोधात तक्रारींचा पा...
Continue reading
८ महिलांचे ३५ धक्कादायक चित्रफिती; जवळच्या व्यक्तीनेच उघड केला भोंदू Ashok Kharat चा काळा चेहरा!
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा Ashok Kharat प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तंत्र-मंत्र आणि दैवी शक्तींचा आव आणत महिलांना जाळ्यात...
Continue reading
नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार, अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे....
Continue reading
पुणे : महाराष्ट्रात भोंदूगिरी करणाऱ्या बुवा-बाबांच्या प्रकरणाने पुन्हा एकदा चिंतेची लाट निर्माण केली आहे. नाशिकमधील अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार ...
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. न...
Continue reading
नाशिकमधील कॅप्टन अशोक खरातचा प्रताप राज्यभरात धक्कादायक ठरला आहे. महिलांवरील लैंगिक अत्याचारासह त्याच्याविरोधात अनेक आर्थिक अपहार...
Continue reading
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. अशोक खरातवर महिलांवर लैंगिक छळ करण्याचे, व्हिडिओ तयार करण्याचे...
Continue reading
स्वयंघोषित ‘कॅप्टन’ म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. महिलांच...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/adgaon-medical-chowk-turned-into-a-traffic-jam-due-to-encroachment-and-rickshaw-stops/