रोहित अन् गंभीर बोलत राहिले, विराट कोहली न थांबता रुममध्ये निघून गेला

विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय संघातील कथित अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. पहिल्या वनडेत भारताने थरारक विजय मिळवल्यानंतर रांचीतील टीम हॉटेलच्या लॉबीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे रोहित शर्मा, विरार कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील संबंधांबाबत नव्याने तर्क–वितर्क सुरू झाले आहेत.

सामना जिंकल्यानंतर कर्णधार के. एल. राहुल सहकाऱ्यांसोबत केक कापून सेलिब्रेशन करताना दिसला. याचवेळी रोहित शर्मा गंभीरसोबत उभा राहून चर्चा करत होता. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते विराट कोहलीच्या वागण्याने. व्हायरल व्हिडीओत विराट हातात मोबाइल पाहत गंभीरकडे दुर्लक्ष करत थेट आपल्या रूमकडे जाताना दिसतो.

यामुळे, “विराटने खरंच गंभीरला इग्नोर केलं का?” असा प्रश्न चर्चेत आला आहे. काहींचा दावा आहे की दोघांत मतभेद असल्यामुळे हा प्रसंग घडला, तर काहींनी याला निव्वळ योगायोग असल्याचं म्हटलं आहे. विराट कोणाशी फोनवर बोलत असण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते.

Related News

महत्वाचं म्हणजे, मैदानात विराटने शानदार शतक ठोकत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चाही पुरस्कार पटकावला होता. भारतीय संघाने 349 धावांचा डोंगर उभारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 332 धावांवर रोखत 17 धावांनी सामना जिंकला. अशा विजयानंतर संघात कोणतेही तणाव असल्याचा अधिकृत पुरावा समोर आलेला नाही.

तरीही, हॉटेल लॉबीतील त्या काही सेकंदांच्या व्हिडीओने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. तो केवळ एक साधा प्रसंग होता की खरोखरच संघातील नात्यांमध्ये तणाव आहे, याचं स्पष्ट उत्तर सध्या तरी मिळालेलं नाही. मात्र सोशल मीडियावर हा विषय जोरदार चर्चेचा ठरला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/swara-bhaskarche-sasare-in-hospital-due-to-brain-haemorrhage/

Related News