बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराची धुळ शमल्याबरोबरच भारतीय जनता पक्षाने आता पश्चिम बंगालकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही महिन्यांत राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने मोठी तयारी सुरू केली असून, पक्षाची संपूर्ण निवडणूक मशीनरी बंगालमध्ये उतरवण्यात आली आहे.
पक्षाने पश्चिम बंगालचे पाच प्रमुख जोनमध्ये विभाजन केले आहे. या प्रत्येक जोनसाठी स्वतंत्र प्रभारी, संघटन मंत्री आणि रणनीतीकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी सहा संघटन मंत्री आणि इतर सहा राज्यांतील अनुभवी व वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती करून त्यांना तात्काळ बंगालमध्ये कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजप नेतृत्वाने स्पष्ट केले आहे की येणाऱ्या पाच महिन्यांपर्यंत हे सर्व नेते बंगालमध्येच मुक्काम करतील, स्थानिक कार्यकर्त्यांशी समन्वय साधतील, बूथ ते प्रदेश पातळीवर संघटनात्मक रचना मजबूत करतील आणि जमिनीवरची निवडणूक रणनिती आखतील.
Related News
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जासाठी पक्षांकडून शुल्क, इच्छुकांची नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता...
Continue reading
“IIT Mumbai vs IIT Bombay या नावाबाबतचा वाद पुन्हा पेटला आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले. मनसे-भाजप ...
Continue reading
अमरावती: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवणगाव-फत्तेपूर परिसरात रविवारी (दि. २४) रात्री सुमारे ११.३० ते ११.४५ दरम्यान सलग भूकं...
Continue reading
तेल्हारा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोट तेल्हारा व हिवरखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ ...
Continue reading
Solapur Hyderabad Highway Accident मध्ये क्रुझरचा टायर फुटून 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. धाराशिव-परण्डा आणि सोलापूर-पुणे महा...
Continue reading
नवी दिल्ली : भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी एक गंभीर चेतावणी जारी केली आहे. लष्कर-ए-तैयबाचा (LeT) प्रमुख हाफिज सईद हा भारताविरुद्ध नवा फ्रंट उघडण...
Continue reading
आत वसलेलं गुप्त शहर आणि आढळला इस्रायली सैनिकाचा मृतदेह
इस्रायल–हमास युद्धविरामानंतर सुरू झालेल्या सर्च ...
Continue reading
Cheapest Alcohol in India : भारतातील कोणत्या 10 राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये दारू सर्वात स्वस्त मिळते? गोवा, हरियाणा, दमण, सिक्कीम, हि...
Continue reading
दुबई एअर शोमध्ये भारतीय HAL Tejas लढाऊ विमानाचा प्रात्यक्षिकादरम्यान अपघात झाला. विमान अचानक उंची गमावून जमिनीवर आदळले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ...
Continue reading
Hingoli Crime : हिंगोलीत पती-पत्नीच्या वादातून घडलेली धक्कादायक हत्या; सासरा आणि मेव्हण्याने जावयाची दगडाने हत्या केली; दोघांवर गुन्हा नोंद, ताब्...
Continue reading
भाजपला मोठा धक्का! शिंदे दिल्लीहून परतताच राज्यातील राजकारण तापलं; हिंगोलीत भाजप उमेदवाराची ऐनवेळची माघार, शिवसेनेत प्रवेश
राज्यात सुरू असलेल्या निवडणूक परीस्थितीत
Continue reading
भाजपचे ध्येय यावेळी बंगालमध्ये सत्ता मिळवण्याचे असून, त्यासाठी ते केंद्रीय नेतृत्व, रणनीती तज्ज्ञ आणि संघटन यंत्रणा या तिन्हींचा जोरदारपणे वापर करत आहेत. राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता, हा निवडणूक प्रचार अत्यंत कडवा आणि चर्चेत राहणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, बंगालमधील समाजघटक, मतदारवर्ग, प्रादेशिक राजकारण आणि मागील निवडणुकांचे डेटा यांचा सखोल अभ्यास करून प्रत्येक जोनसाठी स्वतंत्र रणनीती आखली जाईल. स्थानिक असंतोष, विकासकामे, सुरक्षा प्रश्न आणि केंद्र–राज्य नातेसंबंध या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात मतदारांशी संवाद साधण्याची पक्षाची तयारी आहे.
भाजपच्या या हालचालींमुळे पश्चिम बंगालची राजकीय तापमानपातळी आता आणखी वाढेल, असे दिसत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/biggest-victory-of-india-under-tariff-pressure-in-2025-india-tariff-impact-is-the-biggest-good-news-for-america/