पेमा खांडू सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री !

पेमा खांडू यांनी आज सलग तिसऱ्यांदा

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Related News

इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये

हा शपथविधी सोहळा पार पडला.

चौना मीन यांनी शपथविधी सोहळ्यात

अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर,

बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू,

वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना,

मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा,

केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग

यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.

या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सुद्धा उपस्थित होते.

नुकत्याच अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका

पार पडल्या.

६० सदस्यीय विधानसभेत

भाजपने ४६ जागा जिंकल्या होत्या,

तर एनपीपीने ५, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ३

आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल ने

दोन जागा जिंकल्या होत्या.

तर काँग्रेस एका जागेवर

तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीसोबतच

१९ एप्रिलला लोकसभा निवडणुका झाल्या होत्या.

अरुणाचल प्रदेशातील लोकसभेच्या दोन्ही जागा

भाजपने जिंकल्या आहेत.

Read also : https://ajinkyabharat.com/departure/

Related News