पारस औष्णिक विद्युत केंद्रातील कामगारांचा आनंदोलनाचा इशारा

पारस औष्णिक विद्युत

पारस औष्णिक विद्युत केंद्रातील  कामगारांचा आनंदोलनाचा इशारा

बाळापूर, ताप्र: पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांनी आपल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करत, आनंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगारांनी कामगार मंत्र्याकडे वेतन वाढ आणि जीवन विम्याच्या देयकाची अदायगी न झाल्याबाबत तक्रार केली आहे.

कामगारांनी म्हटले की, रॉयल ट्रॅव्हल या कंत्राटदाराकडून कामगारांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. महानिर्मिती मुख्यालयाच्या परिपत्रकानुसार, राज्यातील विविध औष्णिक विज केंद्रातील कंत्राटी कामगारांना वेतन, सोईसुविधा आणि अन्य हक्क उपलब्ध करणे अनिवार्य आहे. मात्र कंत्राटदारांकडून मुख्यालयीन नियम काटेकोरपणे अमलात आणले जात नाहीत, असा आरोप कामगारांनी केला आहे.

कामगारांचे म्हणणे आहे की, विज व्यवस्थापन आणि विभाग प्रमुख हे बेजबाबदार कंत्राटदारांकडून फक्त कागदी दाखला घेत आहेत आणि प्रत्यक्षात ठोस कारवाई करत नाहीत. तसेच, पारस विज केंद्राच्या कर्मचारी यांच्या पाल्यासाठी पुरवण्यात येणारी स्कूल बस सेवा देखील रॉयल ट्रॅव्हलमार्फत चालत आहे.

Related News

कामगारांनी व्यवस्थापनाला वेळोवेळी पत्राद्वारे समस्या सांगितली असतानाही योग्य न्याय मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांचा दावा आहे की, कार्यकारी अभियंता, विभाग प्रमुख आणि विज व्यवस्थापन कंत्राटदारांची पाठराखण करत आहेत, ज्यामुळे कामगारांचे कायदेशीर हक्क उल्लंघन होत आहेत.

सर्व रॉयल ट्रॅव्हल कर्मचारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, येत्या काही दिवसात महानिर्मिती मुख्यालयाचे सीएमडी यांना या प्रकरणी कायदेशीर पत्र पाठवले जाईल.

read also : https://ajinkyabharat.com/7-amazing-benefits-of-drinking-water-it-is-an-important-remedy-for-the-body/

Related News