पातुर तालुक्यातील ग्रामीण समस्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

पातुर

पातुर: पातुर तालुक्यातील विविध ग्रामीण विभागांमध्ये नागरिकांना चालू असलेल्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी पातुर तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

तालुक्यातील पांडुरंग, पांढुर्णा, सोनुना, अंधार सांगवी, पिंपळ डोळी, गोळेगाव, आलेगाव अशा आदिवासी बहुल गावांमध्ये नागरिकांना तालुका ठिकाणी ये-जा करण्यासाठी एसटी बस सेवा नियमित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आधार सेंटर बाबत देखील मागणी केली आहे; आलेगाव येथे आधार सेंटरची संख्या तीन-चार करण्यास आणि पांढुर्णा, सोनुना, पिंपळ डोळी, नवेगाव, उंबरवाडी, पहाडशिंगी, सावरगाव, अंधार सांगवी या प्रत्येक गावात किमान एक आधार सेंटर सुरू करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली.

निवेदन 13 नोव्हेंबर 2025 रोजी तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांना दिले गेले. तहसील प्रशासन या समस्यांचे निराकरण करणार असून, एसटी बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी आगार व्यवस्थापकांशी पत्रव्यवहारही करण्यात येणार आहे.

Related News

read also : https://ajinkyabharat.com/balapurchaya-main-road-padela-khadda-akher-buzvila/

Related News