सहस्त्रकुंड धबधब्यावर पाण्याचा अचानक लोट; पाच पर्यटक नदीत अडकले,

सहस्त्रकुंड

ढाणकी बातमीदार संजय भोसले

नदीपात्रात अडकलेले पर्यटक स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बाहेर

सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यास संपूर्ण महाराष्ट्रातून तेलंगना राज्यातून पर्यटक येत असतात. आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सहस्त्रकुंड धबधबा येथे एकांबा येथील भाविक देव दर्शना करीता नदी पलीकडे गेले होते. जाताना नदी पत्रात पाणी कमी असल्याने त्यांनी नदी पत्रातून पायी जात
नदी पत्राच्या मध्य भागी येताच अचानक पणे कोरडी असलेली नदी पाण्याने भरून वाहू लागली.

त्यावेळी मात्र त्या पर्यटक नदी पत्रात अचानक पणे आलेल्या पाण्याने घाबरून जात आपला जीव वाचवण्यासाठी मोठ मोठ्यांनी ओरडू लागले.धबधबा पाहण्यास आलेल्या पर्यटकानी आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली तर नदी पत्रात धबधब्याच्या मधोमध तीन महिला एक पुरुष एक चिमुरडी मुलगी दिसली त्यांनी त्वरित विश्राम गृहच्या कर्मचाऱ्याला माहिती दिली.

विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने त्वरित बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना घटनेची माहिती दिली ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी त्वरित उपविभागीय अधिकारी सखाराम मूळे, तहसीलदार राजेश सुरडकर यांना कल्पना दिली. नदी पत्रात असलेल्या मुरली बंधरा येथून पाणी सोडण्यात आले ते पाणी त्वरित बंद करण्याचा सूचना बंधारा कर्मचाऱ्याला दिल्या.

कर्मचाऱ्याने त्वरित नदी वरील गेट बंद करून पाणी पुरवठा थांबवीला. स्थमिक मच्छिमार यांना पाचरण करून नदी पत्रात अडकलेल्या प्रवास्यांना सुखरूप बाहर काढण्यात आलेउपविभागीय अधिकारी सखाराम मूळे, तहसीलदार राजेश सुरडकर, ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी सहतरकुंड धबधबायला भेट देऊन अडकलेल्या प्रवास्यांना धीर दिला.

read also : https://ajinkyabharat.com/forensic-experts-investigation-process-7-tremendous-secrets-how-forensic-experts-investigate-from-rape-to-explosion-to-bloodshed/