अविश्वास ठराव पारित ,समर्थकांकडून दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
मा.आमदार चैनसुख संचेती गटाने १३ विरूद्ध २ ने जिंकला अविश्वास ठराव
मलकापूर (स्वप्नील अकोटकर) –
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात २० मे रोजी
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
संचालकांनी अविश्वास ठरावाची मागणी केली होती. आज ३१ रोजी अविश्वास ठरावावरील प्रस्तावावर
विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाने हा ठराव जिंकला आहे.
संचेती गटाला १३ संचालकांनी पाठिंबा दिला. तर शिवचंद्र तायडे यांच्या बाजूने २ संचालक होते.
शिवचंद्र तायडे यांना आपले सभापती पद गमावावे लागले आहे.
सौम्य लाठीचार्ज व दगडफेक
अविश्वास ठराव सभेला आलेल्या संचालकांची गाडी अडवण्यात आली होती
यादरम्यान गर्दींना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला असून एका गटाने पोलिसांवरच दगडफेक केली.
तायडे व संचेती गट आमने सामने
यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तायडे व संचेती गट आमोरासमोर आले होते
यावेळी त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
144 कलम होती लागू
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल रात्रीपासूनच 144 कलम लागू करण्यात आली होती
तरीसुद्धा संचेती व तायडे यांच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मोठा पोलीस बंदोबस्त होता तैनात
कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज अविश्वास ठरावाची विशेष बैठक असल्याचे गांभीर्य लक्षात घेता
पोलिसांकडून वेगवेगळ्या पोलीस फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या यामुळे परिसराला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले होते.