ब्रह्मपुरीतील इथेनॉल प्रकल्पात भीषण स्फोट; दोन किलोमीटरपर्यंत धक्के, परिसरात दहशत
ब्रह्मपुरी शहरातील बोरगाव रोडवरील रामदेव बाबा साल वनटंस कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पात आज, 19 नोव्हेंबर सायंकाळी प्रचंड स्फोट झाला आणि भीषण आग लागली. या स्फोटाचा आवाज आणि धक्के तब्बल दोन किलोमीटरपर्यंत जाणवल्याने परिसरात दहशत पसरली. तरीही या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बोरगाव गावाजवळील रामदेव बाबा फॅक्टरीच्या समोरील इथेनॉल प्रकल्पात सुमारे सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच प्रचंड स्फोट झाला, ज्यामुळे जनजीवन काही वेळासाठी स्थिरावले. या धक्क्याचा प्रभाव बोरगाव, इंदापूर, झिलबोडी, फुलेनगर, पेटवाड, धूमनखेळा, शिवाजी चौक आणि ब्रह्मपुरी शहरातील विविध भागांमध्ये स्पष्टपणे जाणवला. अनेकांनी घर हलल्याचा अनुभव सांगितला असून, काही घरांच्या काच फुटल्याच्या देखील बातम्या समोर आल्या आहेत.
कंपनी परिसरात तब्बल एक लाख लिटर इथेनॉलच्या साठा असल्याचे समोर आले असून, यामुळे आग अधिक भीषण स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रकल्प नुकताच पुन्हा सुरू झाला होता, त्यामुळे या घटनेने आणखी चिंता वाढवली आहे.
Related News
ChatGPT ला मुलीबद्दल विचारला प्रश्न; काही मिनिटांतच पोलीस तरुणाच्या घरी, AI च्या वापरावर पुन्हा प्रश्नचिन्ह
आजच्या डिजिटल युगात ChatGPT आणि इतर AI टूल्सचा वापर झपाट्याने वाढत आहे....
Continue reading
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग; रविंद्र चव्हाणांचा 2 दिवसांचा विदर्भ दौरा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ...
Continue reading
IMD Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा जोर; 10 जिल्ह्यांना हवामान विभागाचा मोठा इशारा, विदर्भात रेड अलर्ट
महाराष्ट्रात पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुस...
Continue reading
सैनिक हत्या : अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील तेलगोटे हत्या प्रकरणात आरोपी अंकित उर्फ छोटू खंडारे याचा जामीन न्यायालयाने रद्द केला. धमक्यांच्या तक्रारीनंतर तात्काळ अटकेचे आद...
Continue reading
4 वर्षे सातत्याने काम करूनही कमी पडलो; उघड्या मॅनहोलच्या जीवघेण्या धोक्यावर आयुक्त अश्विनी भिडेंची मोठी कबुली
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे : गेल्या काही दिवसांपासून सुरू अस...
Continue reading
राजभवनातील सुरक्षा व्यवस्थेत धक्का; SRPF जवानाच्या मृत्यूमागचं कारण काय?
मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या अतिसुरक्षित राजभवनातून सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली...
Continue reading
Mumbai News: मानखुर्दमध्ये भीषण दुर्घटना! तीन मजली घर कोसळल्याने 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर
मुंबईतील मानखुर्द परिसरात रविवारी रात्री एक अत्यं...
Continue reading
मुनगंटीवार म्हणाले- ‘जिल्ह्याचं कल्याण त्यांनीच ठरवलंय’ : राज्यातील सत्ताधारी भाजपमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र सातत्याने मांडले जात असले, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील अंतर्गत ...
Continue reading
मोठी धक्कादायक घटना! डोंबिवलीतील धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला, 7 कुटुंबांचे तातडीने स्थलांतर
डोंबिवली पश्चिम परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध...
Continue reading
श्रीरामपूर हादरलं! भरदिवसा तरुणावर गोळीबार, जुन्या वादाचा संशय; पोलीस तपास वेगात
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुरुवारी (2 जुलै) भर...
Continue reading
मॅनहोलमध्ये पडून मुंबईकराचा मृत्यू, उपमहापौरांचा BMC आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप
मॅनहोलमध्ये पडून मृत्यू : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय अस्लम शेख यांचा म...
Continue reading
घटना घडल्यावर ब्रह्मपुरी, नागभीड, शिंदेवाही तसेच गडचिरोली येथील फायर ब्रिगेडच्या पथकांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. आग मोठ्या प्रमाणात असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेकडून फोर्म सोल्युशनसह दोन फायर टेंडर रवाना केले गेले. तसेच पोलीस दल आणि डॉक्टरांची टीमही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. काही वेळाने आग आटोक्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आली.
या घटनेनंतर कंपनीतील सुरक्षा उपाययोजना आणि इथेनॉल साठा याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घाबरू नये, तसेच परिसरात दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.
या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीती असली तरी, वेळेवर केलेल्या प्रतिसादामुळे जीवितहानी टळली, आणि पुढील उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सतत कार्यरत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be/