पिंपळगाव लेंडी शिवारात आढळले महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत..

सिंदखेड राजा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पिंपळगाव लेंडी शिवारातील गट नंबर १५२ मधील द्वारका

सुभाष गायकी यांच्या जुन्या पडक्या शेतातील खोली मागे दि ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजता एका

अनोळखी महिलेचा अर्धवट जळलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याबाबत शेलगाव राऊत येथील पोलीस

पाटील राहुल चव्हाण यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली,

माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सदर घटनास्थळी एका २५ वर्षीय महिलेचे

अर्धवट जळालेल्या अवस्थेत प्रेत आढळून आले, सदर मृत महिलेच्या डाव्या पायाची बोटे कापलेले आढळून आली,

सदर माहिलेंच्या पायाला सहा बोटे असावेत असा पोलिसांचा कयास आहे, महिलेच्या अंगावर जॅकी कंपनीचे कपडे

आढळून आले, सदर अज्ञात व्यक्तीने महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डेड

बॉडी पिंपळगाव लेंडी शिवारामध्ये आणून टाकली असावी. पोलिसांनी महिलेचे प्रेत उच्चस्तरीय

शवविच्छेदन कारन्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे पाठवीले असून
घटनास्थळी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी,

उपविभागीय पोलिस अधिकारी कदम मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे लांडे, अंढेरा पोलीस

स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील
यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद

नरवाडे करत आहेत, सदर या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून खून्यातील

गुन्हेगारीचा तपास करण्याचे खूप मोठे आवाहन किनगाव राजा पोलिंसासमोर उभे आहे.