शेगाव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी
सालाबादप्रमाणे यंदा १३ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी संतनगरीतून पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे.
सकाळी ७ वाजता भक्तिमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून श्रींची पालखी पंढरपूरला आषाढी सोहळ्या करिता मार्गक्रमण करेल.
Related News
यंदा पालखीचे ५५ वे वर्ष असून इकडून जातांना ३३ दिवसांची पायदळ वारी करीत वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत.
पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील.
१४ जूनला गायगाव रात्री भौरद, १५ व १६ जून पालखी अकोला राहील.
त्यानंतर १७ जून भरतपूर रात्री वाडेगाव, १८ जून देऊळगाव (बाभूळगाव) रात्री पातूर तर १९ जूनला मेडशी रात्री श्रीक्षेत्र डव्हा,
२० जून मालेगाव रात्री शिरपूर जैन, २१ जून चिंचाबा पेन
रात्री म्हसला पेन, २२ जून किनखेडा रात्री रिसोड, २३ जून
पान कन्हेरगाव रात्री सेनगाव, २४ जून श्रीक्षेत्र नरसी रात्री डिग्रस, २५ जून श्रीक्षेत्र औंढा
नागनाथ रात्री जवळा बाजार, २६ जून (अडगाव रंजोबा)
हट्टा रात्री श्रीक्षेत्र त्रिधारा, २७ जून परभणी, २८ जून ब्राम्हणगाव रात्री दैठण, २९ जून खळी रात्री गंगाखेड, ३० जून वडगाव
(दादा हरी) रात्री परळी थर्मल, १ जुलै परळी वैजनाथ, २ जुलै कन्हेरवाडी रात्री अंबाजोगाई, ३ जुलै
लोखंडा सावरगाव रात्री बोरी सावरगाव, ४ जुलै गोटेगाव रात्री कलंब, ५ जुलै गोविंदपूर रात्री तेरणा सा. कारखाना
, ६ जुलै किनी रात्री उपडा माकडाचे, ७ जुलै संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशिव रात्री धाराशिव,
८ जुलै वडगाव सिद्धेश्वर रात्री श्रीक्षेत्र तुळजापूर, ९ जुलै सांगवी रात्री उळे, १० जुलै सोलापूर, ११ जुलै
सोलापूर, १२ जुलै सोलापूर रात्री तिरहे, १३ जुलै कामती (वाघोली) रात्री माचपूर, १४ जुलै ब्रम्हपुरी रात्री
श्रीक्षेत्र मंगळवेढा, १५ जुलै रोजी पालखी श्रीक्षेत्र मंगळवेढा वरून विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार आहे
. पंढरपूर येथे १७ जुलै रोजी आषाढी सोहळा आटोपून पाच दिवसांच्या मुक्काम नंतर २१ जुलै
पासून परतीचा प्रवास सुरु होणार असून पुन्हा २२ दिवसांचा पायदळ परतीचा प्रवास करीत श्रींच्या पालखीचे
११ ऑगस्ट रोजी स्वगृही आगमन होईल.
Read Also
https://ajinkyabharat.com/majha-baap-builder-asata-tar-punyaat-grand-state-level-essay-competition/