महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल कधी जाहीर करणार हे जाहीर केलं आहे.
Maharashtra SSC Result 2024 Date पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
Related News
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सच...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार ...
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
समृद्धी महामार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ; टायर फोडून लुटमार, दगडफेक अन् हवेत गोळीबार, तब्बल १८ लाखांचा ऐवज लंपास
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ...
Continue reading
CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या; व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकासकामांना वेग आला असून, या का...
Continue reading
Elon Musk यांच्या ‘X’ला मोठा धक्का? जुन्या Twitter ची पुन्हा एंट्री; माजी कर्मचाऱ्यांनीच उभारले ‘Twitter.now’
सोशल मीडिया विश्वात पुन्हा एकदा ‘Twitter’ या नावाची चर्चा सुरू झाली आ...
Continue reading
शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना AI आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा सल्ला
शेती क्षेत्रासमोरील वाढता ...
Continue reading
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा डबल झटका! दूध आणि ऑटो-टॅक्सी प्रवास महागणार; सप्टेंबरपासून खर्च वाढण्याची शक्यता
सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांच्या घ...
Continue reading
ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका; तब्बल 35 हजार फॉलोअर्स घटले, ठाकरेंना अनफॉलो केल्यानंतर चर्चांना उधाण
धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंब...
Continue reading
Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
Abhijeet Dipke CJP Founder : कॉकरोच जनत...
Continue reading
मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार
याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर केल्यानंतर राज्यातील
विविध शाळांमधील विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाची वाट पाहत होते. आता अखेर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची तारीख
जाहीर करण्यात आली आहे.
आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल.
याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो.
तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो.
सीबीएसईनं काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता.
महाराष्ट्रात सीबीएसईच्या तुलनेत मोठ्या संख्येनं विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करतात. गेल्या काही वर्षांमध्ये
महाराष्ट्रात देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात 2023-24 या
शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.
दहावीची परीक्षा पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण आणि लातूर विभागांमार्फत परीक्षांचं आयोजन केलं जातं.
या विभागीय मंडळांकडून उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल तयार करण्याचं काम पूर्ण झालं आहे.
आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं.
दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील काही
भागात अकरावीचा प्रवेश ऑफलाईन पद्धतीनं करण्यात येतो. मुंबई सह काही शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाते.