हैदराबाद: अमरावतीच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा त्यांच्या विधानामुळे वादात सापडल्या आहेत. राणा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एमआयएमनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. राणा यांच्या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव वाढू शकतो, असं एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटलं.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माधवी लतांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. या सभेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘१५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. ओवैसी बंधूंना कळणारही नाही ते कुठून आले आणि कुठे गेले,’ असं विधान राणा यांनी सभेत केलं.
‘एक लहान आणि एक मोठा भाऊ आहे. लहान भाऊ म्हणतो, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवा, मग आम्ही दाखवतो आम्ही काय करु शकतो. त्या लहान भाऊला मला सांगायचंय, तुला १५ मिनिटं लागतील. आम्हाला तर केवळ १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला करा. लहान-मोठ्याला कळणारही नाही कुठून आले आणि कुठे गेले. आम्हाला केवळ १५ सेकंद पुरेशी आहेत,’ असं राणा म्हणाल्या. हा व्हिडीओ राणा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी यांना टॅग केलं आहे.
Related News
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सच...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार ...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Elon Musk यांच्या ‘X’ला मोठा धक्का? जुन्या Twitter ची पुन्हा एंट्री; माजी कर्मचाऱ्यांनीच उभारले ‘Twitter.now’
सोशल मीडिया विश्वात पुन्हा एकदा ‘Twitter’ या नावाची चर्चा सुरू झाली आ...
Continue reading
ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका; तब्बल 35 हजार फॉलोअर्स घटले, ठाकरेंना अनफॉलो केल्यानंतर चर्चांना उधाण
धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंब...
Continue reading
Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
Abhijeet Dipke CJP Founder : कॉकरोच जनत...
Continue reading
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या...
Continue reading
अमरावतीत रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षाला भीषण आग; तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा गंभीर आरोप
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नव...
Continue reading
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल हो...
Continue reading
हातात आयफोन, चहाचा कप आणि… डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरा...
Continue reading
शिंदेंच्या या खासदाराला 100 टक्के मंत्रिपद? मोदींच्या मंत्रिमंडळात थेट एन्ट्रीची चर्चा; बंडू जाधवांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!
Continue reading
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय फायदा होईल’
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू ...
Continue reading
नवनीत राणा यांच्या विधानावरुन एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांनी पलटवार केला आहे. ‘भाजपचे नेते निवडणूक सुरु असताना अशी विधानं करत आहेत. यामुळे नियमांचं, आचारसंहितेचं उघडपणे उल्लंघन होत आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणी कठोर कारवाई करायला हवी. या विधानामुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो,’ असं पठाण म्हणाले.
नवनीत राणा यांच्यासारखी विधानं मी केली असती, तर आज मी तुरुंगात असतो, असं पठाण यांनी म्हटलं. ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं विधान अकबरुद्दीन ओवैसींनी केलं होतं. त्यानंतर ते स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाले. ४० ते ४२ दिवस तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मग त्यांनी न्यायालयात लढा दिला. मग या प्रकरणातून त्यांची सुटका झाली. आता तसंच विधान राणांनी केलं आहे. निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई कधी करणार? त्यांना तुरुंगात कधी पाठवणार?, असे प्रश्न पठाण यांनी उपस्थित केले आहेत.