नाशिक : महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी दि. १० जून रोजी मतदान होणार आहे.
सन २०२४ हे पूर्ण वर्ष निवडणुकांचे आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात दि. २० मे रोजी मतदान होणार आहे. त्या पाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघ, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुढील काही महिन्यांतच निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासह नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदारांची मुदत दि. ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित चार मतदारसंघांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून सध्या किशोर दराडे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने नाशिक विभागातही निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीबाबतची अधिसूचना बुधवारी (दि. १५) जारी झाली.
Related News
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची उपस्थिती
अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण
मुंबई :...
Continue reading
Thackeray सरकारच्या आरोपांवरून मुंबईत निवडणूक मंडळ आणि राजकीय वर्तुळांमध्ये चर्चेचा बवंडर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray य...
Continue reading
Jay भानुशालीपासून घटस्फोटानंतर माही विजची भावनिक ‘आय लव्ह यू’ पोस्ट; मित्र नदीमसाठी शब्दांचा वर्षाव, कमेंट सेक्शन बंद ठेवल्याने चर्चांना उधाण
मुंबई : मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता...
Continue reading
Mumbai महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा दावा; उद्धव–राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत
Mumbai आणि आजूबाजूच्या परिसराला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा षडयं...
Continue reading
Mumbaiत मध्यरात्री हादरा: चांदिवलीतील नारायण प्लाझा इमारतीला भीषण आग, दोन तरुणांचा मृत्यू
Mumbai– शहरात एकच काळी रात्र झाली. एका बाजूला राज्यातील राजकी...
Continue reading
Mumbai : डॉकर्यार्ड रोडवरील कापूस वेअरहाऊस आग – संपूर्ण घटना, परिणाम आणि भविष्यातील धोके
Mumbai शहरातील डॉकर्यार्ड रोड जवळील कापूस वेअरहाऊसमध्ये बु...
Continue reading
“क्यूँ रोना आ रहा है?” – दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर पोस्टपार्टम संघर्षांमुळे भावूक झाली Bharti Singh
प्रसिद्ध कॉमेडियन Bharti Singh सध्या आयुष...
Continue reading
मोठी राजकीय बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 municipal मध्ये स्वतंत्र लढत, निकाल कधी?
Continue reading
Mumbaiमुंबईत डिजिटल अरेस्ट: 68 वर्षीय महिलेला 3.71 कोटी रुपयांची फसवणूक
Mumbaiत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 68 वर्षीय महिलेला तब्बल 3.71 कोटी रुपयांची फ...
Continue reading
राज्यातील महापालिका निवडणुकीचा अंतिम टप्पा: उमेदवारी अर्ज आणि राजकीय गोंधळ
राज्यातील महापालिका निवडणुका 2025-26 सत्रात एका उच्च ताणाच्या स्थितीत प्रवेश क...
Continue reading
शिल्पा Shinde पुन्हा ‘भाबीजी घर पर हैं 2.0’ मध्ये दिसणार, मुंबईत राहण्यासाठी हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली
शिल्पा Shinde, ‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेत्...
Continue reading
…हे मतदानही सोमवारी
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी सोमवार, दि. २० मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्ट्यांमुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनानेदेखील व्यक्त केली आहे. आगामी निवडणुकांचे मतदान सलग सुट्ट्यांना लागून येऊ नये, असे विनंतीपत्र जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच निवडणूक आयोगाला दिले होते. परंतु, तरीही शिक्षक मतदारसंघाची निवडणूकदेखील शनिवार, रविवारच्या सलग सुट्टीला लागून सोमवारीच घेण्यात येणार आहे.
…असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्धी- दि. १५ मे
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत- २२ मे
नामनिर्देशनपत्रांची छाननी- २४ मे
नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत- २७ मे
मतदानाचा दिनांक- १० जून
मतदानाची वेळ- सकाळी आठ ते दुपारी चार
मतमोजणीचा दिनांक- १३ जून
एकूण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा दिनांक- १८ जून
नाशिक विभागातील शिक्षक मतदार संख्या
जिल्हा मतदार
नाशिक २३५९७
अहमदनगर १४६४८
जळगाव १३०५६
धुळे ८०८८
नंदुरबार ५४१९
एकूण ६४८०८