डॉ.देवयानी अरबट याची अजिंक्य भारतच्या जागर आदिशक्तीचा या नवरात्र उत्सवातील उपक्रमांतर्गत घेतलेली मुलाखत :
अकोला : आजच्या आधुनिक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत लोकांना फिटनेस आणि आरोग्य सांभाळणे मोठे आव्हान ठरत आहे. व्यायाम आणि आहारशास्त्रासोबतच ताण-तणाव व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे. या सगळ्या गोष्टींचा समतोल साधत आरोग्याचा नवा अध्याय लिहिणाऱ्या व्यक्ती म्हणजेच डॉ. देवयानी अरबट. अकोल्यातील सिनर्जी फिटनेस अँड वेलनेस क्लबच्या संस्थापिका असलेल्या डॉ. अरबट यांनी गेल्या दहा वर्षांत शेकडो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत. फक्त व्यायामच नव्हे, तर समग्र दृष्टिकोनातून लोकांना नव्या ऊर्जेची, आत्मविश्वासाची आणि आरोग्यदायी जीवनशैलीची दिशा दाखवणे हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.
Related News
read also : https://ajinkyabharat.com/gavakyancha-anti-divisional-anguish/