स्वामी चैतन्यानंदच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश

गुरुचा काळा चेहरा उघड झाला

दिल्ली पोलिसांनी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात बाबा चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी यांना आग्रातून अटक केली आहे. दक्षिण दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेशी संबंधित या स्वामीवर विद्यार्थिनींविरुद्ध लैंगिक शोषण आणि करिअर उद्धवस्त करण्याचे गंभीर आरोप होते.आरोपीची अटक:पोलिस तपासात समोर आले की, फरार असलेला चैतन्यानंद आग्रा येथील ताजगंज परिसरातील हॉटेल होम फर्स्टमध्ये लपला होता.हॉटेलच्या खोली क्रमांक 101 मध्ये तो आपला अड्डा बनवून ठेवलेला होता.रात्री विद्यार्थिनींना बोलावून आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न करत होता.दिल्लीच्या वसंतकुंज पोलिस ठाण्यात 4 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला होता आणि तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते.रात्री उशिरा पोलिस कारवाई:शनिवार-रविवारच्या मध्यरात्री, रात्री 3.30 वाजेच्या सुमारास, पोलिसांनी हॉटेलला घेरले आणि थेट खोली क्रमांक 101 मध्ये पोहोचले. बाबाने फारसा विरोध न करता पोलिसांना शरण जाणे पत्कारले. अटक केल्यानंतर त्याला थेट दिल्लीला नेण्यात आले.हॉटेल कर्मचाऱ्यांचा खुलासा:बाबाने हॉटेलमध्ये ओळखपत्र जमा केले होते.रात्री साधारण 3 वाजता पोलिस आले आणि खोलीत थेट त्याला पकडले.तो शेजारी राहणाऱ्या कौशल भाई यांच्यासोबत हॉटेलमध्ये आला होता. काळ्या कृत्यांचा पर्दाफाश:चैतन्यानंदच्या अटकेने त्याच्या काळ्या विश्वाचा खरा चेहरा समोर आला आहे.पीडित मुलींच्या तक्रारी आणि पोलिसांच्या कठोर कारवाईने हे स्पष्ट झाले की, कोणी कितीही मोठा गुरु बनला तरी पापाचा घडा एक दिवस फुटतोच.दिल्ली पोलिस आता त्याची सतत चौकशी करत आहेत, आणि या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

read also:https://ajinkyabharat.com/continuous-pavasamu-kapashi-and-soybean-peak-dhokya/