आस्की किड्सच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

शालेय अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा कौशल्यही चमकले

अकोट – कुस्ती, धावणे, गोळफेक, रायफल शुटींग, तायक्वांडो, बुद्धिबळ अशा विविध क्रीडा स्पर्धेत आस्की किड्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तालुक्यातील सर्वपरिचित गुणवत्तापूरक शैक्षणिक संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या प्रशिक्षणाचा परिणाम यशस्वीरीत्या दाखवला. वर्ग १० वी चे हमजा पटेल (कुस्ती), गिरीधर दाभाडे (१०० मीटर रन), चैतन्य बोंद्रे (८०० मीटर रनिंग), आराध्य लाडोळे, शिवपाल बेठेकर, गिरीधर दाभाडे, चैतन्य बोंद्रे (४०० मीटर रिले) यांनी जिल्हास्तरावर विजयी मजल मारली. वर्ग ९ आणि ८ चे खुशाली भास्कर (गोळाफेक) व राजदत्त डिक्कर (बुद्धिबळ) यांनीही जिल्हास्तरावर यश मिळवले. वर्ग १० चे हमजा पटेल (वेट लिफ्टिंग), मिथिलेश अकर्ते (रायफल शुटिंग), प्राची कुटे (तायक्वांडो) आणि वर्ग ९ ची गौरी झामरे (तायक्वांडो) यांनी विभागस्तरावर आपली मजल दाखवली. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रम आणि क्रीडा सराव यामध्ये समतोल राखत क्रीडा शिक्षक प्रशांत रंधे सर व जिग्नेश चावडा सर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत करून हे यश मिळवले. यशस्वी स्पर्धेसाठी शाळेचे नितीनजी झाडे, प्राचार्य नेहा झाडे आणि पर्यवेक्षक पवन चितोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

read also:https://ajinkyabharat.com/vidyarthyanani-rangit-dance-aani-funsey-dressmithy-ghetla-part/