स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांत साकारले संत गाडगेबाबांचे कार्य

बाळापूर –मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत सुरू असलेल्या पंधरवाडा कार्यक्रमाच्या निमित्ताने वाडेगाव ग्रामपंचायतीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला गावकऱ्यांसह विद्यार्थी, शाळकरी मुले, शिक्षक, कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

गावातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा तसेच बालाजी, गुरुकुल आणि जागेश्वर शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरील कचरा व घाण विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने झाडू मारून गोळा केला.

या उपक्रमात पोलिस कर्मचारी, डॉक्टर, महसूल विभागातील कर्मचारी आणि ग्रामस्थही सहभागी झाले. “विद्यार्थ्यांत संत गाडगेबाबांचा आदर्श आज साकारला,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Related News

कार्यक्रमावेळी सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, प्रभारी ग्रामविकास अधिकारी योगेश कापकर तसेच गावातील पत्रकार बंधू उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून मुख्यमंत्री पंचायतराज कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

read also:https://ajinkyabharat.com/shetkari-putra-aghavegala-agitation/

Related News