सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सर्वजण थोडक्यात बचावले

सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, सर्वजण थोडक्यात बचावले

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुदैवाने सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुखरूप आहोत, अशी माहिती अंधारेंनी सोशल मीडियावर शेअर केल्याने समर्थकांचा जीव भांड्यात पडला.

सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधीच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याने मोठा अनर्थ टळला. सुषमा अंधारे आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास बारामतीला रवाना होणार होत्या. महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाड येथून निघाल्या होत्या. यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या.

इतक्यात हेलिकॉप्टरला अपघात झाला. हा प्रकार सुषमा अंधारे यांच्या डोळ्यादेखतच झाला. अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले असून सर्वजण सुखरुप आहेत. परंतु हेलिकॉप्टरची दृश्यं धडकी भरवणारी आहेत.

Related News

हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अपघातातून सर्वजण बालंबाल बचावल्याने दिलासा मानला जात आहे.

महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. आदित्य ठाकरेंनी तत्परतेने फोन केला आणि दहा मिनिटात सर्व यंत्रणा कामाला लावली, असंही त्यांनी सांगितलं.

Related News