जाणून घ्या खास फीचर्स

जाणून

हे 5 स्मार्टफोन्स iPhone 17 पेक्षा कमी नाहीत; जाणून घ्या खास फीचर्स

iPhone 17 ची विक्री भारतात सुरू, किंमत तब्बल 82,999 पासून 1.02 लाखांपर्यंत


iPhone 17 च्या विक्रीला भारतात मोठी सुरुवात झाली आहे. काल सेलला लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मात्र, या फोनची किंमत तब्बल 82,999 रुपये पासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटची किंमत 1.02 लाखांपर्यंत जाते. त्यामुळे हा फोन प्रत्येकालाच परवडेल, असं नाही. पण काळजी करू नका. बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, जे थेट iPhone 17 ला टक्कर देतात. चला तर पाहूया हे 5 खास स्मार्टफोन –

1. Samsung S25 (किंमत – ₹64,999)

सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन उत्कृष्ट AMOLED डिस्प्ले आणि 50MP ट्रिपल रियर कॅमेरासह येतो. यात 5G सपोर्ट आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आहे, जो गेमिंग व मल्टीटास्किंगसाठी परफेक्ट ठरतो. दमदार बॅटरीमुळे हा फोन दिवसभर आरामात चालतो.

2. Google Pixel 10 (किंमत – ₹79,999)

AI-सक्षम फीचर्समुळे Pixel 10 खास मानला जातो. त्याचा कॅमेरा आणि स्मार्ट गुगल असिस्टंट आयफोनशी थेट स्पर्धा करतात. नाईट साइट टेक्नॉलॉजीमुळे रात्रीसुद्धा उत्तम फोटोग्राफी करता येते. याशिवाय, यात शुद्ध अँड्रॉइडचा अनुभव मिळतो.

3. OnePlus 13 (किंमत – ₹69,999)

वनप्लस 13 स्लीक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे. यात 120Hz फ्लुइड AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरमुळे आयफोन 17 च्या ए-19 चिपसेटला हा फोन थेट आव्हान देतो. फास्ट चार्जिंग आणि जास्त बॅटरी बॅकअप ही त्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत.

4. Xiaomi 15 (किंमत – ₹64,999)

शाओमी 15 हा दमदार स्पेसिफिकेशन्ससह येतो. यात 120Hz CrystalRes AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आणि 5240mAh बॅटरी मिळते. 90W फास्ट वायर्ड आणि 50W फास्ट वायरलेस चार्जिंग ही याची खासियत आहे. किंमत आयफोनच्या निम्म्याहून कमी असूनही सर्व फीचर्स यात मिळतात.

5. Samsung S24 Ultra (किंमत – ₹71,999)

या फोनमध्ये 200MP चा पॉवरफुल कॅमेरा आणि गॅलेक्सी एआयची ताकद आहे. 5X टेलिफोटो लेन्स सपोर्टसह 4 कॅमेरे, स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर, लांब बॅटरी लाइफ आणि डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले यामुळे हा फोन आयफोनला जोरदार स्पर्धा देतो. यामध्ये तब्बल 7 वर्षांचे OS अपडेट्स मिळतात, ही मोठी जमेची बाजू आहे.

 एकंदरीत, iPhone 17 ची किंमत जास्त असली तरी Samsung, Pixel, OnePlus आणि Xiaomi चे हे फ्लॅगशिप फोन कमी किमतीत उत्कृष्ट परफॉर्मन्स देतात. त्यामुळे आयफोन घेणं शक्य नसेल तरी हे पर्याय नक्कीच ग्राहकांना आकर्षित करू शकतात.

read also : https://ajinkyabharat.com/suicide-murder-poisancha-tapas-suru/