वाडेगाव : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले. गावातील पुढील पिढी समाजहितासाठी सजग राहावी यासाठी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.१८ सप्टेंबर रोजी सकाळी श्री जागेश्वर विद्यालय, श्री बालाजी इंग्लिश स्कूल, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषदेची शाळा, उर्दू शाळा वाडेगाव आदी शाळांमध्ये प्रबोधनाचे आयोजन झाले. या वेळी कर्तव्यदक्ष सरपंच मेजर मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार, ग्रामविकास अधिकारी योगेश कापकर, सदस्य मोहम्मद मुजाहीद कुरेशी, डॉ. शेख चांद, हनीफ भाई, सुनील घाटोळ, अय्याज साहील, सतीश सरप यांसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाला मुख्याध्यापक गोपाल मानकर, दिपक मसने, समाधान सोर, हमीद शारीक, उपमुख्याध्यापक शिंदे, खेर्डे यांसह विविध शाळांचे शिक्षक सहभागी झाले. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, पालक, विद्यार्थी व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रबोधनातून विद्यार्थ्यांना समाजातील जबाबदाऱ्या, शिक्षणाचे महत्त्व आणि ग्रामविकासातील सहभाग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
read also : https://ajinkyabharat.com/extreme-and-manner-pavasamuhe-shetkari-hawaladil/
