रंजीत पाटील काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रोगनिदान शिबिर

“पद नाही... तरीही सेवा थांबत नाही !

दहिगाव गावंडे  : “पद नसले तरी जनतेची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” या भावनेतून सदैव कार्यरत राहणारे अखिल भारतीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष रंजीत पाटील काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिगाव गावंडे येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात रुग्णांना मोफत तपासणीसह डोळ्यांच्या ऑपरेशनची सोय उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपक मोरे व डॉ. हर्षवर्धन मालोकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. शितल काळे, सेवा सोसायटी अध्यक्ष दिनेश काळे, तसेच अकोल्यातील नामांकित डॉक्टर्स डॉ. स्वप्नील लाहोळे, डॉ. मदन महल्ले, डॉ. आर्टिलता ठाकरे, डॉ. अमृता खुपसे उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राजूभाऊ शाह, नारायण उमाले, शिवम भलतिलक, उमेश काळे, शुभम काळे, निलेश पाटील काळे, करीम शाह, सुमित पोपळी, स्वप्नील काळे, आशिप शाह, गोपाल कंबरकर, सूरज काळे, अविनाश भगत, आशीष डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला असून समाजसेवेसाठी तत्पर राहणाऱ्या रंजीत पाटील काळे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/wadegaon-grampanchaycha-undertaking/