अहमदनगर : ‘महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले नाही. ईडी सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता यामुळे देशात भाजपा विरोधी मोठी लाट आहे. राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसल्याने महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा जागा नक्की मिळतील,’ असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये आयोजित सभेत थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षांत करावयाची कामे याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे. मात्र सध्याचे पंतप्रधान हे धर्माचे राजकारण करत आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. न्यायव्यवस्था दबावात आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला आहे. देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवर अन्याय झाल. मात्र पंतप्रधानांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी आहे. देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल. त्यांनी कितीही ४०० पारचे नारे दिले तरी २०० चा आकडाही त्यांना गाठता येणार नाही, असेही थोरात म्हणाले.
वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासंबंधी थोरात म्हणाले, ‘वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने मोठी संधी दिली. आपल्याकडे कायम त्यांचा सन्मान होत होता. राज्यात आणि देशपातळीवरही काम करण्याची संधी होती. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला. हे सर्वांना माहिती आहे. मात्र रूपवते यांनी काँग्रेस सोडणे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे, असे ठरणार असल्याने मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.
Related News
गोपीनाथ मुंडे यांचे खरे राजकीय वारस कोण?
सारंगी महाजन यांचं मोठं विधान; पुन्हा वातावरण तापणार!
बीड : गोप...
Continue reading
Pankaja Munde’s मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात ; समाजातील दरी मिटविण्याचा आवाहन
Pankaja Munde यांनी मनोज जरांगेंवर भाष्य करत एकता, आरक्षण आणि व...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी : Sarangi Mahajan यांचे धडाकेबाज विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात Gopinath Munde यांच्या राजकीय वा...
Continue reading
बाळापूर: तालुक्यातील वाडेगाव येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीत अनेक सुविधा नसल्यामुळे शेतकरी गंभीर त्रासात आहेत. या...
Continue reading
सोलापूरमध्ये भाजप प्रवेश: राजकीय वातावरण आणि ऑपरेशन लोटस
सोलापूरमध्ये भाजप प्रवेश जोरात सुरू आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांचा समावे...
Continue reading
करुणा शर्मांच्या आरोपांनी बीडमधील राजकीय वातावरणात खळबळ
बीड – ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेत करुणा शर्मांनी केलेले आरोप सध्या राज्याच्या राजकीय मंडळीत ज...
Continue reading
कुरूम जि.प. सर्कलमध्ये भाजपकडून संतोष शिरभाते यांचे नाव चर्चेत
अकोला जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरूम सर्कलमधील राजकीय वातावरण सध्या खूपच ग...
Continue reading
संविधानावर बूट फेकणे म्हणजे लोकशाहीवरील हल्ला: सामना अग्रलेखातून तीव्र टीका
मुंबई:हिंदूंचे राज्य म्हणजे धर्मांधांचे नाही असा थेट इशारा सामनाच्या अग्र...
Continue reading
काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवरील चर्चेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अम...
Continue reading
आर्णी तालुक्यात प्रशासकीय संवेदनहीनतेचा कळस; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपलीपूरग्रस्त शेतकर्यांना वार्यावर सोडून तीन मंडळ अधिकारी, 11तलाठी सहलीवर!तहसीलदारांचीही द...
Continue reading
तरुण-तरुणींना सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांमधील
कामांचा अनुभव मिळावा आणि ते रोजगारक्षम व्हावेत यासाठी
एकनाथ शिंदे सरकारनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरु केली.
मुंबई...
Continue reading