धामणीखडी गावातून शिबिरासह ग्रामस्थांना माहिती

‘समृद्ध पंचायतराज अभियान’

कारंजा : मा. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ कारंजा तालुक्यातील धामणीखडी गावातून दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सौ. पूनम राणे, विस्तार अधिकारी श्री. माधवराव साखरे व श्री. संजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. अध्यक्षस्थान सरपंच श्री. महादेव खडसे यांनी भूषविले. यावेळी संत गाडगे बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गटविकास अधिकारी सौ. पूनम राणे यांनी ग्रामस्थांना विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. त्यात सुशासनयुक्त पंचायत, स्वनिधी, लोकवर्गणी, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा, शाळा व अंगणवाडी सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, टी.बी. मुक्त गाव उपक्रम, अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये सुविधा व महिलांसाठी बचत गट व बँक कर्ज वितरण यांचा समावेश होता.

विस्तार अधिकारी श्री. माधवराव साखरे यांनीही ग्रामस्थांना योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री. पांडुरंग गव्हाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच श्री. महादेव खडसे यांनी मानले.

कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी व ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

read also :https://ajinkyabharat.com/womens-rognidan-shibir-held/