महिला रोगनिदान शिबिर आयोजित

स्त्रियांसाठी मोफत तपासण्या आणि सल्ला”

कारंजा: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, कारंजा येथे महिला रोगनिदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.

उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते, त्यात तेजस्विनी ताई डहाके यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यविषयक समस्या लवकर निदान होऊन योग्य उपचार मिळावेत, असा उद्देश ठेवण्यात आला होता.

शिबिरामध्ये स्त्रीरोग तपासणी, कर्करोग तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी यांसह इतर आरोग्यविषयक सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उपक्रमाद्वारे “आरोग्यदायी महिला – सशक्त समाज” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला असून, महिलांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेण्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.

तसेच, रुग्णालय परिसरात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले. या वेळी तेजस्विनी ताई डहाके यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून रुग्णालयातील स्टाफकडून सत्कार स्वीकारला.

read also :https://ajinkyabharat.com/american-military-theate-bangladeshit/