नवी दिल्ली:भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढत असतानाच एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. अमेरिकन हवाई दलाचे C-130 हरक्यूलिस विमान थेट बांगलादेशातील शाह अनामत विमानतळावर उतरले असून, त्यामधून तब्बल 100 अमेरिकी जवान व अधिकारी उतरल्याची माहिती समोर आली आहे.
हे जवान ढाक्यातील प्रसिद्ध रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले. पण आश्चर्य म्हणजे त्यांच्या उपस्थितीची नोंद हॉटेलच्या रजिस्टरमध्ये कुठेही आढळून आलेली नाही. त्यामुळे हा दौरा गुप्त ठेवण्यात आल्याची शंका बळावली आहे.
भारतावर दबाव आणण्याचा डाव?
भारताने अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतरही वॉशिंग्टनच्या अटी न मानल्याने अमेरिका संतप्त झाल्याचे संकेत मिळत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या शेजारील देशांना हाताशी धरून रणनीती आखल्याची चर्चा रंगली आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तान अमेरिकेकडे झुकल्याचे दिसत असून, हे दोन्ही देश अमेरिकेच्या रणनीतीत महत्त्वाचे घटक ठरू शकतात.
बंगालच्या उपसागरातील चटगांव परिसर हा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने अमेरिकन सैन्याच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे.
भारताची सज्जता
दरम्यान, भारतानेही म्यानमारमध्ये तिन्ही सैन्य दलातील 120 जवान रवाना करून सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीमावर्ती भागात घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर भारतीय गुप्तचर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे.
गुप्त युद्धाभ्यास की मोठा कट?
या हालचालींना अमेरिकन-बांगलादेशीय संयुक्त युद्धाभ्यास म्हणून पाहिले जात असले तरी ते इतक्या गोपनीयतेत का ठेवले गेले, हा प्रश्न गंभीर आहे. अमेरिकेची ही हालचाल भारताविरोधातल्या मोठ्या रणनीतीचा भाग असल्याची शंका तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
एकंदर परिस्थिती पाहता भारत-अमेरिका संबंध आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता असून, दक्षिण आशियाई भू-राजकारणात मोठे वादळ उठण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.
read also :https://ajinkyabharat.com/maharashthal-four-jilhiyana-ati-vrishthacha-tremendous/
