राळेगाव : तालुक्यातील वाढोणा ते लाडकी पांदण रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावून रस्ता त्वरित चालू करावा अशा मागणीचे निवेदन वाढोणा बाजार ते लाडकी पांदण रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांनी बुधवार दि १७ रोजी तहसीलदार राळेगाव यांचे मार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले आहे.वाढोणा बाजार ते लाडकी हा रस्ता सुमारे २ ते ३ किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी केवळ 800 मीटर पेक्षा कमी अंतराचेच मातीकाम झाले आहे. उर्वरित भाग आजतागायत अपूर्ण व रखडलेले आहे. सदरील मातीकाम हे कमीत कमी ८ ते १० वर्षाच्या आधी झाले आहे.गावापासून सुरुवातीचा काही भाग खडीकरणासाठी प्रस्तावित असून ते काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. परंतु, आजतागायत प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.रस्त्याचा सर्वाधिक खराब व बिकट भाग हा गावापासून १ किलोमीटरच्या पुढील भागात आहे. हा भाग शेतकऱ्यांच्या दैनंदिन हालचालीस अत्यंत महत्त्वाचा असून तातडीने काम करणे आवश्यक आहे.सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग वापरावा लागत असून जसे कि दुसऱ्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावरून त्यात वाद निर्माण होतात.शासनाने दाखवून दिलेला पांदण रस्ता प्रत्यक्षात निष्क्रिय असून त्यावरून पादचारी देखील नीट चालू शकत नाहीत. मग बैल बंडी दुचाकी अथवा चारचाकी ट्रॅक्टर वाहतुकीसाठी तर तो अजिबात उपयोगी नाही.पावसाळ्यात व उन्हाळ्यात सुद्धा रस्त्याच्या १ किलोमीटर पलीकडे कंबरभर पाणी साचलेले असते वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.त्यामुळे रस्त्याच्या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष वेधून हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा.अशी मागणी वाढोणाबाजार लाडकी येथिल शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदाराकडे केली आहे.वाढोणा बाजार ते लाडकी हा रस्ता फक्त नावापुरता रस्ता आहे, या रस्त्याचा उपयोग आम्हा शेतकऱ्यांना कोणत्याच काम साठी करता येत नाही.
read also : https://ajinkyabharat.com/deputy-district-rugnalaya-karanja-lad-thishe-well-famous-women-strong-family/
वाढोणा ते लाडकी रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लावा शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

17
Sep