जिल्हा परिषदेच्या शाळा तहानल्या! चिमुकल्यांना घरातूनच पाणी आणण्याची वेळ
अकोट : तालुक्यातील पुंडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळे मध्ये चिमुकल्यांना स्वतःचा घरून पाणी आणण्याची वेळ आली आहे तसेच दुपार चा वेळेत खिचडी वाटप झाल्या नंतर तर चक्क घरी जाण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे पाणी आणण्यासाठी काही चिमुकले घरी जातात तर काही चिमुकले भीतीवरून चढून तर काही पायी बाजूचा मंदिरात पाणी आणण्यासाठी जातात अक्षरशः चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ हा जिल्हा परिषद शाळा येथे सुरू आहे.तालुक्यात दर्जेदार शिक्षणासोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक शाळेत स्वच्छतागृह उभारण्यात आले असले तरी तेथे पाणीच नसल्या कारणाने त्याचा वापर होत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. अशीच अवस्था तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक पुंडा शाळेची आहे. येथे स्वच्छतागृह आहे ते ओस पडलेले आहे तसेच पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर उघड्यावर लघुशंकेसाठी किंवा शौचास जावे लागते. प्रत्येक शाळांसाठी बंधनकारक आहे. त्यात शाळेत वीज, स्वच्छ पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, वॉल कंपाऊंड अशा बाबींचा समावेश आहे. मात्र, सद्य:स्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी चिमुकल्यांना वणवण फिरावे लागत आहे.
पालकांच्या प्रतिक्रिया
कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होते.ज्यामुळे थकवा,डोकेदुखी,चक्कर येणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास अडचण येते,इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते आणि शारीरिक व मानसिक कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. यामुळे त्वचा निस्तेज होते.आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखणे कठीण जाते त्या मुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत हा चिमुकल्यांच्या आरोग्याशी होणारा खेळ हा थांबवावा.
वैशाली गजानन आढे यांनी म्हतलं आहे कि- शाळेकडे 2 एकर शेती आहे आणि शैक्षणिक फंडात देखील निधी आहे जर पाण्याचा आणि शौचालयाचा गंभीर प्रश्नांवर शाळा खर्च करत नसेल तर हा निधी नेमका कुठे जातो हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
योगेश इंगळे
योगेश इंगळे पालक तथा सदस्य शाळा व्यवस्थापन समिती
शाळेत पाणी नसल्या मुळे मुलांना पाणी आणन्या करिता तारे वरची कसरत करावी लागत आहे त्या मुळे आमचा पाल्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुख्याध्यापक या बाबी त्यांचा लक्षात आणून देऊन वारंवार दुर्लक्ष करीत आहेत ६ महिन्या पासून परिस्थिती जैसे थे आहे.
सदर बाबतीत गटशिक्षण अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
read also : https://ajinkyabharat.com/shetkayanchaya-problem-sodavanyacha-undertaking/
