काय आहे गगनयान?
गगनयान मोहीम ही इस्रोची महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत भारत पहिल्यांदाच मानवाला अंतराळात पाठवणार आहे.
मानवाला पृथ्वीच्या निम्न कक्षेत (Low Earth Orbit) पाठवणे, त्यांचे सुरक्षित अंतराळ प्रवास सुनिश्चित करणे आणि पुन्हा सुरक्षितपणे
पृथ्वीवर आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. यामधून भारताचे अंतराळ क्षेत्रातील सक्षम नेतृत्व जगासमोर आणणे हेही ध्येय आहे.
यंदा ‘व्योममित्र’ अंतराळात
गगनयान मोहिमेतील पहिले मानवरहित प्रक्षेपण डिसेंबर २०२५ मध्ये होणार आहे.
यामध्ये व्योममित्र नावाची अर्धमानवाकृती (ह्युमॅनॉईड) अंतराळात पाठवली जाणार आहे.
त्यानंतर अजून दोन मानवरहित प्रक्षेपण होणार असून या मोहिमा मानवासारख्या परिस्थितीत यंत्रणा कशा प्रकारे कार्य करतात याची चाचणी घेतील.
२०२७ मध्ये भारतीय पाऊल अंतराळात
२०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारतीय अंतराळवीर पहिल्यांदाच अंतराळात झेपावतील.
या मोहिमेत तीन भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात येईल.
मोहिमेचा कालावधी अंदाजे ३ दिवसांपासून ते एका आठवड्यापर्यंत असू शकतो. यामुळे भारत मानवाला
अंतराळात पाठवणाऱ्या काही मोजक्या देशांच्या यादीत सामील होईल.
Read also : https://ajinkyabharat.com/purnace/