यश दयालवर यूपीसीएची बंदी; युपीटी-२० लीगमधून बाहेर

बलात्कार प्रकरणात अडकलेल्या यश दयालवर यूपीसीएची बंदी; युपीटी-२० लीगमधून बाहेर
बलात्कार प्रकरणात अडकलेल्या यश दयालवर यूपीसीएची बंदी; युपीटी-२० लीगमधून बाहेर

भारताचा उभरता डावखुरा वेगवान गोलंदाज आणि आरसीबीचा आयपीएल विजेता खेळाडू यश दयाल

याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बलात्काराच्या प्रकरणात अडकल्यानंतर उत्तर प्रदेश क्रिकेट

असोसिएशनने (UPCA) त्याच्यावर युपीटी-२० लीगमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे.

जयपूरमध्ये अल्पवयीनवर बलात्काराचा आरोप

जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली

यश दयालविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे. ही कारवाई झाल्यापासून दयाल मैदानापासून दूर आहे.

मे महिन्यात तो शेवटचा आरसीबीकडून आयपीएल २०२५  जिंकताना दिसला होता.

युपीटी-२०  मधून हकालपट्टी

दैनिक जागरणच्या माहितीनुसार, यंदाच्या युपीटी-२० मध्ये गोरखपूर लायन्स संघाने ७  लाख रुपयांत खरेदी केलेल्या

दयालला UPCA ने बंदी घातली आहे. संघटनेच्या सूत्रांनी सांगितले की, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

दोन राज्यांत वेगवेगळे गुन्हे दाखल
२१  जून रोजी गाझियाबादमध्ये एका महिलेनं लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप

करत मुख्यमंत्री तक्रार पोर्टलवर तक्रार केली होती. त्यानंतर औपचारिक एफआयआर दाखल झाला

आणि इलाहाबाद उच्च न्यायालयाने अटकेवर स्थगिती दिली. मात्र, जुलैच्या सुरुवातीला जयपूरमध्ये अल्पवयीनवरील

बलात्काराचा गुन्हा नोंदवल्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने अटकेवर स्थगिती नाकारली.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/295-taqit-beneficiary-compiled-shibir/