लोणार बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या गळ्यात डॉ. बछीरे घातली १० प्रश्नांचे लेबल लावलेले पुष्पहार घालण्यात आले
सविस्तर बातमी अशी की, लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री माननीय मकरंद पाटील
यांना विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे यांनी पालकपत्रांच्या
स्वागतासाठी शेतकऱ्यांच्या समस्याचे दहा प्रश्नाचे लेबल चिटकवून पालकमंत्र्याचे अगळे वेगळे स्वागत करून पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले
डॉ. बछीरे यांनी पालकमंत्र्यांना विचारलेले प्रश्न
१) पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे विदर्भात सरसकट नुकसान भरपाईचे अग्रीम सानुग्रह अनुदान कधी देणार?
२) गत २ वर्षाची गारपीटीची नुकसान भरपाई कधी देणार?
३) गत २ वर्षाच्या अतिवृष्टीची मदत कधी मिळणार?
४) शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार?
५) गत ३ वर्षाचा पिक विमा शेतकऱ्यांना कधी देणार?
६) शेतकऱ्यांना पीक कर्जातून कधी मुक्त करणार?
७) शेतकऱ्यांची वीज बिल कधी माफ करणार?
८) 2025 च्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी देणार?
९) महाराष्ट्र शासन शेतकऱ्यास कधी दिलासा देणार?
१०) जल जीवन मधील भ्रष्टाचार दूर करून घर घर नल मे जल कधी देणार? पालकमंत्र्याच्या गळ्यात या प्रश्नांचे लेबल लाऊन
स्वागत पुष्पहार घालून निवेदन देऊन विचारणा केली असता पालकमंत्री यांनी लवकरात लवकर या
प्रश्नांची उत्तर आपणास मिळतील अशी हमी सर्व जनसमुदाया समोर दिली.
याप्रसंगी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सिद्धार्थ खरात साहेब,
शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख प्रा.आशिष रहाटे, तालुकाप्रमुख राजू बुधवत,
शहर प्रमुख गजानन जाधव, महिला तालुका संघटिका तारामती जायभाये, संजीवनी वाघ,
लूकमान कुरेशी, श्रीकांत मदनकर, तानाजी मापारी, सुदन अंभोरे सर, तानाजी अंभोरे,
कैलाश अंभोरे, ज्ञानेश्वर दूधमोगरे, अशपाक खान, फहीम खान, रामभाऊ मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolid-jcb-muhe-jalwahini-footli/
