शेतकऱ्यांवर एकाच वेळी कामांचा ताण

शेतकऱ्यांवर एकाच वेळी कामांचा ताण

डवरणी, निंदण व रासायनिक खतांचे डोस एकाच वेळी आल्यामुळे मजुरांचा तुटवडा

सध्या शेतकऱ्यांवर शेतीच्या विविध कामांचा एकाच वेळी ताण आल्यामुळे मजुरांची मोठी मागणी निर्माण झाली आहे.

पेरणीनंतर फवारणी, डवारणी, निंदण तसेच रासायनिक खतांचा डोस देण्याची कामे एकत्रच सुरू झाली आहेत.

त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ मजुरांची गरज भासू लागली आहे.

मात्र, उपलब्ध मजुरांची संख्या मर्यादित असल्यामुळे त्यांच्यावर ताण वाढला असून काही ठिकाणी कामांसाठी मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे.

यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामे रखडली असून त्यांचा आर्थिक व मानसिक ताण वाढत आहे.

शेतकरी सांगतात की, “जमीनीवर तण वाढले आहे, त्याच वेळी कीड नियंत्रणासाठी फवारणी आवश्यक आहे,

तसेच खताचा पहिला डोसही द्यायचा आहे. परंतु मजुरांच्या अभावामुळे ही सर्व कामे वेळेत करता येत नाहीत.”

सध्या शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या दरवर्षी कमी होत असल्याचेही निरीक्षण आहे.

त्यामुळे यंत्राच्या साहाय्याने कामे करण्याचा विचार अनेक शेतकरी करत आहेत, मात्र लहान शेतकऱ्यांना यंत्र सामर्थ्य परवडत नाही.

सरकारने मजूर उपलब्धतेसाठी काही उपाययोजना कराव्यात, तसेच यांत्रिक शेतीसाठी अनुदान किंवा भाडे

तत्त्वावरील यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

शेतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मजुरांचा तुटवडा ही गंभीर समस्या ठरत आहे.

यावर तातडीने उपाययोजना न केल्यास उत्पादनावर व परिणामतः शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

“शेतीचं प्रत्येक काम वेळेवर झालं पाहिजे, नाहीतर नुकसान व्हायला वेळ लागत नाही.

पण आता मजूर मिळत नाहीत.

दररोज कुणा न कुणाला विनवण्या कराव्या लागतात.” (किरण ठाकरे शेतकरी हिरपूर )

“सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकटीच डवारणी करतेय.

मजुरांच्या कमतरतेमुळे सगळी जबाबदारी अंगावर आली आहे (अशोक डहाके शेतकरी हिरपूर )

“आमच्यासारख्या शेतकऱ्यांना यंत्र परवडत नाही. आणि मजूर मिळत नाहीत.

एकाच वेळी सगळी कामं आल्यामुळे फारच अडचणीत सापडलोय.” (आशिष गावंडे शेतकरी हिरपूर )

“अगोदरच्या काळातही कामं खूप असायची, पण तेव्हा मजूर भरपूर मिळायचे.

आता गावात काम करणारे लोकच उरले नाहीत.

“कोणालाही शेतीकामात रस नाही (बळवंतराव गणेशपुरे शेतकरी ) ‘

“यंत्राच्या साहाय्याने काही प्रमाणात काम हलकं करता येतं, पण लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना यंत्रखरेदीची ताकद नाही.

शासनाने किरकोळ यंत्रं भाड्याने द्यावीत.”(केशव चारथळ सदन शेतकरी हिरपुर )

शेतकरी सध्या मजुरांच्या तुटवड्यामुळे चिंतेत आहेत. वेळेवर शेतीकामे पूर्ण न होण्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

शासन आणि कृषी विभागाकडून यंत्रसामग्रीसाठी अनुदान, प्रशिक्षण आणि भाडे योजनेची मागणी शेतकऱ्यांची

मागणी आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/palakashnanchaya-galayya-dr-bachir-ghali-10-question/