अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील निविदा घोटाळा

तीन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन जिल्हा स्त्री रुग्णालयात निविदा घोटाळा

तीन अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील निविदा प्रक्रिया घोटाळा प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकासह

दोन उच्च पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नवजात शिशु

अतिदक्षता विभागासाठी सन 2024-25 मध्ये 31 जागा भरण्यासाठी ई निविदा प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे.

यासाठीची निविदा प्रक्रिया नियमबाह्य आणि अतांत्रिक पद्धतीने करण्यात आल्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक

डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह दोन उच्च पदस्थ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत.

जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जयंत पाटील आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी ए.एन. डांबरे यांचा यात समावेश आहे.

पावसाळी अधिवेशनात वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी विधानसभेत निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला होता.

दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती.

त्यानुसार निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार चौकशी समितीच्या अहवालात उघड झाला होता.

त्यानुसार आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांचे आदेशावरून तिन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले

असून निलंबनानंतर तिन्ही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार आहे.

एकाच वेळी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने अकोल्याच्या आरोग्य विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/santosh-kakde-yanchi-district-best-excellent-tehsildar/