बार्शीटाकळी पोलिसांची 10 डिजे

बार्शीटाकळी पोलिसांची 10 डिजे

बार्शीटाकळी प्रतिनिधी

श्रावण सोमवार निमित्त कावड़ यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक

अर्चित चांडक यांनी डिजे सिस्टम वर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशित केले होते

त्या अनुषंगाने बार्शिटाकळी येथे २८ जुलै रोजी श्रावण सोमवार निमित्त कावड़ पालखी मिरवणुक काढण्यात आली होती.

त्या मिरवणुकी मध्ये डिजे साऊंड सिस्टम चा वापर करण्यात आला होता.

मिरवणुक संपल्या नंतर सदर डिजे साऊंड सिस्टम चे दहा वाहने पोलीस स्टेशनच्या परिसरात कार्यवाही करीता लावण्यात आले होते.

तसेच उप प्रदेशिक परिवहन विभागाला पत्र देऊन मोडिफाय (मुळ वाहना मध्ये बदल) केलेल्या वाहना वर

कायदेशीर कार्यवाही करण्यात सहयोग करण्याची विनंती केली होती.

उप प्रदेशिक परिवहन विभागाच्या टीम ने वाहनांची प्रताळणी करुण वाहन क्र. एमएच ०४ एफ पी १८१६ ला ४१ हजार ५०० शे,

एमएच १९ सीएक्स या वाहनाला ३२ हजार, वाहन क्र. एमएच ४ एफ ७८४७ ला ४० हजार, एमएच ०४ डीके ५१७७ ला ३७ हजार,

वाहन क्र. एमएच ४३ वाय १०३५ ला ३२ हजार ५००, एमएच ०४ ई वाय ९८२१ ला ४१ हजार,

वाहन क्र.. एमएच ४० बीजी ०९१५ ला ४० हजार ५००, वाहन क्र. एमएच ३७ टी ३३७५ ला ४० हजार ५००,

वाहन क्र. एमएच ४३ ए डी ०२२१ ला ३७ हजार तर एमएच २८ बी ६५१३ या वाहनाला ३४ हजार असे

दहा डिजे सांऊड सिस्टम च्या वाहनाला ३ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे दंड ठोकण्यात आले असुन डिजे वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/aamchaya-pakshcham-amhi-pahu-rohit-pawanchaya-rigela-mamdar-mitkarichas-vigorous-response/