अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेत वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या
संयुक्त विद्यमाने आज पासून अतिक्रमण मुक्त शहर कारवाई ला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रामध्ये मोहम्मद अली
रोडवरील ताजना पेठ पोलीस स्टेशन चौकी समोरील एका जागेवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली
यावेळी ही जागा खाजगी मालकीची असल्याचा दावा करण्यात आला होता
यावेळी अतिक्रमण काढण्यासाठी विरोधी करण्यात आला परंतु पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त पाहता येथील अतिक्रमण हटविण्यात आले.
यासोबतच खुलेनाट्यगृहाचे फतेह चौक पर्यंतच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. काही अतिक्रमण धारकांनी विरोध केला
महानगरपालिकेने अतिक्रमण काढताना नोटीस द्यायला पाहिजे अशी सुद्धा मागणी करण्यात आली परंतु प्रशासनाच्या वतीने यापूर्वीच
अल्टिमेटम देण्यात आल्यामुळे कोणाचेही म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही शेवटी महापालिका अतिक्रमण विभागाद्वारे प्रमुख रस्त्यावरील
अतिक्रमणावर कारवाई सुरू करण्यात आली या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये धावपळ उडाली असून
अतिक्रमण करणाऱ्यांनी नुकसान होऊ नये यासाठी आप आपल्या अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
फेरीवाले व फुटपाथ विक्रेते यांना मनपाने आधीच जागा दिली आहे त्यामुळे रस्त्यावर लघु व्यवसाय करणारे अतिक्रमण कारवाईमुळे आज दिसून आले नाही.
एकंदरीत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांमध्ये मात्र धावपळ उडाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/tribal-tradition-hich-deshchi-khari-sanskrit-ramakrishna-digar/
