“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची जोरदार कारवाई सुरूच आहे.
अन्न सुरक्षा विभागाच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने आज 31 जुलै 2026 रोजी मोठी कारवाई करत
79,367 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन प्रहार” मोहिम राबवली जात आहे.
याच मोहिमेअंतर्गत आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अकोला रेल्वे स्थानक परिसरात,
अमनदीप हॉटेलजवळ काही संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाली.
पथकाने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संध्याकाळी 6 वाजता त्या ठिकाणी छापा टाकला असता,
दोन व्यक्तींकडून शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व गुटख्याचा साठा सापडला.
1. फरहान खान रसूल खान, वय 34, रा. मिठी बावडी बैधपुरा, अकोला
2. शाहरुख शेख युसुफ चव्हाण, वय 30, रा. मिठी बावडी बैधपुरा, अकोला
दोघांकडून एकूण ₹79,367/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके
यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विष्णू बोडखे, G/PSI दशरथ बोरकर, HC गोकुळ चव्हाण,
HC सुलतान पठाण, PC स्वप्निल खेडकर, PC अन्सार, आणि PC सतीश यांच्या पथकाने केली.
अवैध गुटखा विक्रीवर अकोला पोलीसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई करत एक मोठा टप्पा गाठला आहे.
“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत अशा धाडसत्रांना पुढील काळात अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/professional-cylinder-self-styled-home/
