व्यावसायिक सिलेंडर स्वस्त; घरगुती ग्राहकांना अद्याप दिलासा नाही

व्यावसायिक सिलेंडर स्वस्त; घरगुती ग्राहकांना अद्याप दिलासा नाही

देशभरातील नागरिकांना आज (1 ऑगस्ट) दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ₹33.50 ची कपात केली आहे.

मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता ₹1582.50 झाली असून, यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांच्या खर्चात बचत होणार आहे.

मात्र, 14.2 किलो घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे घरगुती ग्राहकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला दरांचा आढावा घेतात आणि यावेळी कपात फक्त व्यावसायिक सिलेंडरपुरती मर्यादित राहिली आहे.