किडणीच्या आजाराने लोक त्रस्त

किडणीच्या आजाराने लोक त्रस्त

बल्हाडी येथील घटना!

वैद्यकीय सुत्रा कडून तपासनी !

चंदन जंजाळ

बाळापूर ताप्र :- दुर्गम भागातील गट ग्राम पंचायत असलेली बल्हाडी ग्राम येथे कुपनलिकेच्या पाणी वापर असल्याने

येथील नागरीकांना पिण्याचे पाणी दूषित असल्याने लोकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे. गावातील लोक संख्या कमी

असून सुद्धा या भागात मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे स्पष्ट चित्र दिवस आहे

वैद्यकीय पथकाने केलेल्या चाचण्या मध्ये गावातिल ५ नागरिकाला किडणीच्या आजाराने घेरले असल्याचे तपासणी मध्ये दिसून आले.

बल्हाडी येथे २६ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ खान यांच्या मार्गदर्शनात समुदाय आरोग्य

अधिकारी श्रीकांत अमनकर व बाबूराव तायडे आरोग्य सेवक यानी तापसनी लोकांच्या तपासण्या

करुण पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या घेऊन बाळापूर तालुका वैद्यकीय अधिकारी जाधव यानी दिलेल्या

सुचनेचे पालण करत डॉ खान यानी वरील वरील पथक रवाना करूण सर्वे केले.

पथकाने पिण्याच्या पाण्याचे घेतलेले नमुणे घेऊन चिचोंली गट ग्राम पंचायतीला गावातील स्वच्छता व आरोग्यदायक

पिण्याचे पाणी योग्य रित्या देण्याचे पत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे की अधिकारी डॉ सोहेल खान यानी दिले.

Read Also : https://ajinkyabharat.com/hirpramadhyay-gurudev-gorakshanath-maharaj-punyatithi-festival-bhaktibhat-sajra-bhavikanchi-mothi-presence/