राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’

राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’

मुंबई, 

उत्तर भारतीय फूड स्टॉल मालकावर मराठी न बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीच्या वादानंतर मनसे प्रमुख

राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्त निर्देश दिले आहेत की,

Related News

माझ्या परवानगीशिवाय कोणीही माध्यमांशी बोलू नये किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊ नये.

राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलंय की, पक्षाचे अधिकृत प्रवक्ते देखील माझी

पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकणार नाहीत.

हे निर्देश, नुकत्याच पार पडलेल्या ‘आवाज मराठीचा’ विजय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आले आहेत.

या सोहळ्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंचही शेअर केला होता.

मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय दुकानदाराला मराठी बोलायला लावल्याचा आणि न बोलल्यास मारहाण

केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरे आणि मनसेवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

त्यानंतरच हा शिस्तबद्ध आदेश जारी करण्यात आला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/a-paul-clean-tight-gram-panchayat-che-abhiyan/

Related News