शुभमन गिलला ICC चा दंड? ड्रेस कोडचा भंग करताच झाली कारवाईची शक्यता

शुभमन गिलला ICC चा दंड? ड्रेस कोडचा भंग करताच झाली कारवाईची शक्यता

हेडिंग्ले कसोटी | क्रिकेट अपडेट – भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या

पहिल्या कसोटीत दमदार शतक ठोकत चाहत्यांची मने जिंकली,

मात्र त्याच्या एका लहानशा चुकीमुळे ICC कडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related News

गिलने फलंदाजीसाठी मैदानात उतरतानाच नियम मोडला – त्याने पांढऱ्या मोज्यांऐवजी काळे मोजे परिधान केले.

ICC च्या नियम 19.45 नुसार कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंनी फक्त पांढरे अथवा हलक्या रंगाचे मोजे घालणे बंधनकारक आहे.

काय होऊ शकते कारवाई?

मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्याकडून तपास सुरू असून, गिल याला सामना शुल्काच्या 10 ते 20%

पर्यंत दंड बसू शकतो. मात्र गिलने योग्य कारण दिल्यास दंड टळण्याची शक्यता आहे.

 नियम मे 2023 पासून अमलात

मे 2023 पासून लागू झालेल्या या नव्या ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याबद्दल ही पहिली मोठी कारवाई ठरू शकते.

Read Also : https://ajinkyabharat.com/krishna-nadila-purna-situated-gangapur-darrana-dharanantun-vadhavanat-aala-visarga-citizen-alerting-gesture/

Related News