मनसेचा शाळांना इशारा – हिंदी सक्तीला विरोध करा अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने उत्तर दिलं जाईल

अकोला : विद्युत तार चोरी प्रकरण उघडकीस, ५ आरोपी अटकेत; बोलेरोसह मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी, बोरगाव मंजू

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख आदरणीय राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण राज्यभरात

मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

Related News

अकोला जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले असून, मनसेच्या वतीने

जिल्ह्यातील विविध शाळांना राज ठाकरे यांचे पत्र देण्यात येत आहे.

जिल्हा उपाध्यक्ष सतिश मधुकरराव फाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी

अकोला जिल्ह्यातील शाळांना भेट देत हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

शाळांनी स्वखुशीने हिंदी सक्तीला विरोध करावा, अन्यथा आम्ही ‘मनसे स्टाईल’ने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या मोहिमेत मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले, शेखर स्वर्गीव,अजय सरकटे, पुजांजी स्वर्गीव ,

सचिन सहारे, बबलु सरकटे, मोहन प्रदीप आखरे, निलेश आगरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेच्या या पावलामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये एकच खळबळ उडाली असून,

पुढील काही दिवसांत या विषयावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akotat-st-basla-aapti-magil-dinhi-chake-nighali-sudaiwane-jeevani-tali/

Related News