अहमदाबाद – एअर इंडियाच्या बोइंग 787-8 विमानाच्या भीषण अपघातामागे धक्कादायक कारण समोर आलं आहे.
टेकऑफनंतर अवघ्या 15 मिनिटांत मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज हॉस्टेलवर
कोसळलेल्या विमानाच्या दोन्ही इंजिनांना पक्षी धडकले, आणि त्यामुळे इंजिन अचानक बंद झाले.
Related News
जबलपूरमध्ये भीषण दुर्घटना: बरगी धरणात पर्यटकांचा क्रूज बुडाला, 4 जणांचा मृत्यू
“पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! 6 गुप्त मार्गांनी अमेरिकेला मोठा धक्का”
PIN शिवाय पेमेंटची नवी क्रांती; बायोमेट्रिकद्वारे बँकिंग अधिक स्मार्ट
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिताय? डॉक्टरांचा गंभीर इशारा समोर
Arti Singh ने 20 दिवसांत 5 किलो वजन कमी कसं केलं? जाणून घ्या तिचा डाएट
टेक्निकल फेल्युअर नव्हे, पक्षी ठरले कारण!
विमानाच्या दोन्ही इंजिनांनी काम करणे थांबवले, आणि पायलटने तात्काळ इमर्जन्सी सिग्नल दिला.
मात्र वेळ कमी होती आणि विमान काबूत न राहता जमिनीवर आदळले.
प्रवाशांची यादी:
एकूण प्रवासी: 242
भारतीय नागरिक: 169
ब्रिटिश: 53
पोर्तुगीज: 7
कॅनेडियन: 1
क्रू मेंबर्स: 12
बचावकार्य सुरूच
या अपघातात 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. NDRF,
फायर ब्रिगेड व आर्मी घटनास्थळी मदत कार्यात गुंतली आहे.
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
एअर इंडियाचा हेल्पलाइन नंबर:
1800 5691 444 — प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी सुरू करण्यात आलेला हेल्पलाइन.
एअर इंडिया आणि नागरी विमान प्राधिकरणाने तपासाला सुरुवात केली असून,
पक्ष्यांच्या धडकेमुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी नव्या सुरक्षा उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/dahihanda-yehethe-jhaleli-avakali-pavasamue-rahatya-gharchare-moth-damage/
