अकोला तालुक्यातील मासा सिसा ऊदेगाव येथे झुकलेले विद्युत रोहित्र तसेच उघड्या डीपी,
वाकलेले विद्युत खांब व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा यापासून ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.
वीज वितरण कंपनीतील अधिकारऱ्याचे ग्रामीण भागातील वीज तसेच जीर्ण
Related News
झालेल्या वीज तारांची माहिती असताना सुद्धा याकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
मात्र, वीज वितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मागील अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले डीपी, वीज तारा व विद्युत पोल यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
जुन्या डोलाऱ्यावरच वीज वितरणाचे काम सुरू असल्याने वारंवार बिघाड होऊन वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहेत.
शिवाय लोंबकळणाऱ्या विद्युत तारा सतत उघड्या असणाऱ्या व जमिनीपासून
कमी उंचीवर रस्त्यालगत उभारलेल्या डीपी यामुळे लहान मुले,
ग्रामस्थ व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/noida-madhyay-coronache-four-new-sick/
