“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,

"इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,

नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या

झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,

असा संभ्रम निर्माण करणारी इंग्लंडची खेळी पाहून सर्व क्रिकेटप्रेमी थक्क झाले.

Related News

पहिल्या दिवशी इंग्लंडने केवळ ३ विकेट्स गमावून ४९८ धावांचा डोंगर रचत दोन वर्ल्ड रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले.

डकट-क्रॉलीची धडाकेबाज सलामी

टॉस जिंकल्यावर झिम्बाब्वेने इंग्लंडला आधी फलंदाजी दिली आणि तिथेच त्यांच्या अडचणींना सुरुवात झाली.

इंग्लंडच्या सलामीवीरांनी आक्रमक खेळ करत झिम्बाब्वेचा मोर्चा पुरता उध्वस्त केला.

बेन डकटने १३४ चेंडूत १४० धावा केल्या (२ षटकार, २० चौकार) तर झॅक क्रॉलीने १७१

चेंडूत १२४ धावा करत दोघांनी मिळून केवळ ४१.३ षटकांत २३१ धावांची भागीदारी केली.

ही भागीदारी ५.५६ च्या रनरेटने झाली आणि त्यासोबतच त्यांनी एक ऐतिहासिक विक्रम केला —

टेस्ट क्रिकेटमध्ये ५+ रनरेटने दोनदा २००+ ओपनिंग भागीदारी करणारी ही पहिली जोडी ठरली.

ओली पोपचा झंझावात

डकट बाद झाल्यानंतर आलेल्या ओली पोपने अजून वेगात खेळ करत १६३ चेंडूत नाबाद १६९ धावा चोपल्या.

१०३.६८ स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्यांनी २४ चौकार व २ षटकार लगावले.

जो रूट केवळ ३४ धावांवर बाद झाला, मात्र हैरी ब्रूकसह पोप डावाच्या अखेरपर्यंत मैदानात टिकून राहिला.

टेस्ट क्रिकेटमध्ये नव्या विक्रमांची नोंद

इंग्लंडने ३ बाद ४९८ धावा करत टेस्ट क्रिकेटमधील पहिल्या दिवशी सर्वात कमी विकेट गमावून सर्वाधिक

धावा करण्याचा जागतिक विक्रम केला. यापूर्वी २०२२ मध्ये पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध ४ बाद ५०६ धावा केल्या होत्या,

मात्र इंग्लंडने यापेक्षा कमी विकेट्समध्ये जवळपास तितकाच स्कोअर करून इतिहास रचला.

इंग्लंडच्या भूमीवरही हा पहिल्या दिवसाचा सर्वाधिक टेस्ट स्कोअर ठरला.

RCBच्या खेळाडूची दुर्दशा

IPL 2025 साठी RCBने निवडलेला झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानी

याच्यासाठी हा सामना फारसा शुभ ठरला नाही. पहिल्या दिवशी त्यांनी २० षटकांत तब्बल १११ धावा दिल्या आणि केवळ १ विकेट मिळवली.

क्रिकेटप्रेमींनी इंग्लंडच्या या आक्रमणाची मजा घेतली असली, तरी झिम्बाब्वेसाठी हा सामना

‘दुःस्वप्न’ ठरतोय. टेस्ट क्रिकेटमध्ये T20चा कहर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय!

Read Also : https://ajinkyabharat.com/vadhi-vare-musadhar-paus-aani-red-alert/

Related News