“पाकिस्तानच्या ‘पाण्याच्या’ धमकीवर भारताचा संताप;

"पाकिस्तानच्या 'पाण्याच्या' धमकीवर भारताचा संताप;

नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून

पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल

अहमद शरीफ चौधरी यांनी “तुम्ही आमचं पाणी बंद केलं, तर आम्ही तुमचा श्वास थांबवू”

Related News

अशी थेट धमकी दिली आहे. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

हाफिज सईदच्या शैलीत धमकी

पाकिस्तानी अधिकाऱ्याची भाषा ही लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदसारखीच असल्याचं स्पष्ट होत असून,

ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तान दहशतवादाच्या भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही, हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, पाकिस्तानच्या या वर्तनावर जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतरची पार्श्वभूमी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 22 मिनिटात ‘ऑपरेशन सिंदूर’ करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.

त्यानंतर भारताने सिंधू पाणी कराराच्या अंमलबजावणीत मोठे बदल करत पाकिस्तानकडे जाणारे

पाणी रोखण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवरच ही वादग्रस्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर संताप

पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, ट्विटर,

फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर “#PakistanThreat”, “#WaterTerrorism” हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

भारतीय नागरिकांनी पाकिस्तानच्या उघड दहशतवादी समर्थनावर जोरदार टीका केली आहे.

भारताची ठाम भूमिका

भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत. संवाद

आणि दहशतवाद एकत्र चालत नाहीत.” त्यामुळे पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांना

समर्थन दिलं जात असताना कोणतीही माफीशीर भूमिका घेतली जाणार नाही, हे ठामपणे सांगण्यात आलं आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/aryan-khan-turunungat-fakt-fan-aani-paniyavar/

Related News