बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि नंतर पळताना दोन सख्ख्या भावांवर गोळीबार केला.
Related News
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदारांनी गंभीर गैरव्यवहाराचे आरोप करत मोठा गोंधळ घातला.
जुन्या शहरातील शाखेत आज सकाळपासूनच शेकडो ठेवीदारांनी आ...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
पातूर शहरातील भावना पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहण्यासारखा होता.
गुलाबाच्या फुलांनी स्वागत, डोक्यावर रा...
Continue reading
वाशीम | प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर वाशिमजवळील शेलुबाजार इंटरचेंजजवळ ३ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता एक भीषण अपघात झाला.
या अपघातात उमरेड (जि. नागपूर) येथील जयस्वाल कुटुंबातील ...
Continue reading
नागपूर
नागपूरमधील लता मंगेशकर रुग्णालयात मध्य भारतातील पहिलीच यशस्वी लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.
राजस्थानमधील ४० वर्षीय रुग्णाने कॅन्सरमुळे ८ वर्षांपूर्वी लिंग गमावले...
Continue reading
आकोट | प्रतिनिधी
आकोट शहरातील थकीत मालमत्तांवर आकारण्यात आलेली शास्ती शंभर टक्के माफ करून
संबंधित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा, तसेच मालमत्तांवरील कर आकारणीच...
Continue reading
बार्शीटाकळी | प्रतिनिधी
बार्शीटाकळी येथे दिनांक ३ जुलै रोजी गुरुवारी तहसील कार्यालयात संत सेवालाल महाराज बंजारा/
लभाण तांडा समृद्धी योजना अंतर्गत तालुका स्तर समिती क्र. १ व समिती...
Continue reading
अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथील शेतकऱ्यांनी तेल्हारा तहसीलवर मोर्चा काढून
तहसीलदारांना शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले.
एक आठवड्यापूर्वी दिनांक २४ ...
Continue reading
मूर्तिजापूर प्रतिनिधी – ग्रामीण भागातील वीज ग्राहकांवर होणारा अन्याय थांबवावा आणि त्यांचे
वीजबिल तातडीने निम्मे करावे, अशी ठाम मागणी रंभापूर गट ग्रामपंचायतीचे सदस्य प्रशांत इंगळ...
Continue reading
अकोला
एम आय एम शाखेच्यावतीने एक शिष्टमंडळाने अकोला महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आणि
शहरातील गुंटेवारी प्लॉट्सचे लेआउट सुरू करा अशी शिष्टमंडळाने आयुक्तांना मागणी केली होत...
Continue reading
यानंतर संतप्त जमावाने चारपैकी दोन लुटेऱ्यांना पकडून ठोठावून ठार मारले,
तर उर्वरित दोन आरोपी लुटलेली रक्कम घेऊन पसार झाले.
काय घडलं नेमकं?
ही घटना दलसिंहसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरदारगंज येथील आनंद किराणा स्टोअरवर घडली.
सायंकाळच्या वेळेस चार बाईकस्वार लुटेरे दुकानात शिरले. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत
सुमारे सात लाखांची रोकड लुटली. या दरम्यान, दुकानात असलेल्या ग्राहकांवरही त्यांनी हल्ला केला.
पळ काढताना लुटेऱ्यांनी अभिषेक आनंद (48) आणि अनुराग आनंद (45) या दोन भावांवर गोळीबार केला.
अभिषेक यांच्या छातीवर, तर अनुराग यांच्या मांडीवर गोळी लागली.
जखमींना तातडीने स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व पुढील उपचारासाठी बेगूसरायला हलवण्यात आले.
जमावाचा संताप, दोन लुटेऱ्यांना ठोठावून ठार
लुटेर्यांचे हे कृत्य पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत चारपैकी दोन लुटेऱ्यांचा
पाठलाग करून त्यांना पकडलं आणि जोरदार मारहाण करून ठार केलं.
मृत लुटेऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्या जवळ कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रं सापडलेली नाहीत.
पोलीस तपासात व्यस्त, SIT ची स्थापना
घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून अनेक पोलीस ठाण्यांमधून
अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. SP अशोक मिश्रा यांनी माहिती देत सांगितले की,
घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) गठित करण्यात आलं आहे.
पोलीसांनी घटनास्थळावरून एक गोळी आणि काही रिकामे कारतूस जप्त केले आहेत.
मृत लुटेऱ्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फोटो परिसरातील पोलीस स्टेशन,
जिल्ह्यांमध्ये आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
SP यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की,
जर कोणाकडे या लुटेऱ्यांबाबत माहिती असेल, तर ती त्वरित पोलिसांना द्यावी.
ही घटना नागरिकांच्या धाडसाचे उदाहरण असली, तरी कायद्याचा बडगा नागरिकांच्या हातात जाऊ नये,
Read Also : https://ajinkyabharat.com/ipl-2025-playoffsathi-do-or-die-against-mumbai-against-mumbai/